5 lines essay on my favourite tree in Marathi
Answers
*माझे आवडते झाड*
*Essay on my favourite Tree*
झाडे, वन आपल्या जगात महत्त्वाचे स्थान प्राप्त करतात. झाडे, वातावरण व तापमान नुसार वेगवेगळ्या रंगात, आकारात, रुपात आढळून येतात. झाडे आपल्याला प्राण वायु देतात व आजूबाजूचे वातावरण सुशोबित करतात.
माझे आवडते झाड म्हणजेच आंब्याचे झाड होय. आंबा हे फळ महाराष्ट्राचे राष्ट्र फळ असे म्हटले जाते, आणि म्हणूनच हे आंबा बनवणारा आंब्याचे झाड मला खूप आवडते. आंब्याची कलमे छोटी असतात तेव्हा ग्रीनहाऊसमध्ये वाढविण्यात येतात. एकदा मोठी झाल्यानंतर ही कलमे त्या विशिष्ट जागेवर रोवण्यात येतात. आंब्याची झाडे कोकणात खूप आढळून येतात. भारतात सर्वत्र अंबा जरी पिकत असला तरी कोकणातल्या आंब्याची चव जगभरात प्रसिद्ध आहे. हापूस आंबा हा कोंकणातील लाल माती व जांभा या दगडात उगवतो. विविध उपयोगी असे हे आंब्याचे झाड सावली देते , उनापासून सगळ्यांचे रक्षण करते कारण त्याला डेरेदार पण असतात आणि पानाबरोबर आंबा हे फळ सुद्धा लोकं चविष्ट खातात, त्यामुळे या झाडाच्या खाली लोकं विसावतात. आंब्याची पानं शक्यतो सणांमध्ये वापरली जातात. त्यानंतर लग्नसराईच्या दिवसात वापरली जातात, दाराला तोरण लावणे, आंब्याच्या पानांचा हळदीच्या दिवसात वापर करतात आणि लग्नसराईच्या दिवसात आंब्याची पाने वापरली जातात .शिवाय आयुर्वेदामध्ये आंब्याच्या पानांचा औषध म्हणून उपयोग केलेला आहे.