5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा : (कोणतेही दोन)
1 'ग्रंथालये' आणि 'संग्रहालये' राष्ट्रासाठी आवश्यक असतात,' हे विधान स्पष्ट करा..
Answers
Answer:
एखाद्या विषयाशी संबंधित वस्तूंचा व्यवस्थितपणे संग्रह व प्रदर्शन करणारी संस्था म्हणजे संग्रहालय होय. काही संग्रहालयांत एकाहून अधिक विषयांशी संबंधित वस्तूही असतात. संग्रहालये ही वस्तू, शिल्प वगैरेंना असलेली ऐतिहासिक परंपरा, त्या वस्तूंच्या निर्माणकाळाची पुरातन संस्कृती व पार्श्वभूमी असा इतिहास जतन करण्यात मदत करतात. नानाविध वस्तूंचा संग्रह जिथे व्यवस्थितपणे ठेवलेला असतो अशा स्थानाला संग्रहालय किंवा 'वस्तू संग्रहालय' म्हणतात.
संग्रहालय, कलादालन, या समाज शिक्षणासाठी निर्माण झालेल्या रचना आहेत. या ठिकाणी शिकू इच्छिणाऱ्यांचे शिक्षण तर होतेच, पण त्याबरोबर संग्रह वा प्रदर्शन पहायला येणाऱ्या व्यक्तीच्या माहितीत भर घालण्याचे व व्यक्तीची दृष्टी व्यापक करण्याचे कार्य कळत-नकळत होते. संग्रहालय हे समाज शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. कलादालनात एका विशिष्ट विषयापुरती, तात्पुरत्या स्वरूपात प्रदर्शनीय वस्तूंची मांडणी केलेली असते, तर संग्रहालयात ही मांडणी कायमची व रचनाबद्ध असते.
Answer:
*ग्रंथालय म्हणजे सर्व प्रकारची सर्वसाधारण पणे छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रीतपणे ठेवण्याची जागा. ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो. ग्रंथालयातून ही साधने वापरण्यासाठी नेता येतात व मर्यादित कालावधीत परत केली जातात. आधुनिक ग्रंथालयाची संकल्पना बदलली आहे. ग्रंथालय हे माहितीचे देवाण - घेवाण अशी झाली आहे. कारण वाचक पुस्तक न मागता डेटाबेसची माहिती मागण्यासाठी येत असतो.
शाळा-महाविद्यालयांना ग्रंथालय महत्त्वाचे व सक्तीचे असते. यामुळे संदर्भाथित वाचनाची सवय लागते. लिखाण अभ्यासपूर्ण होण्यासाठी अनेक ग्रंथ एकाच ठिकाणे मिळण्याची सोय होते. बदलत्या काळात दृक्श्राव्य माध्यमेही ग्रंथालयांमध्ये दिसून येतात.
नवीन ग्रंथालयांचे स्वरूप हे संगणकीय ही असू शकते. आंतरजालावरून माहितीचा शोध शक्य होतो. तसेच योग्य ते सदस्यत्व घेऊन त्या त्या ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर माहितीचा शोध घेता येतो.
कमीतकमी वेळेत योग्य ते वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि ज्ञान साधनांचा वाढलेला आवाका प्रकाशनांची प्रचंड उपलब्धता माहितीतील वाढ ग्रंथालयाच्या आर्थिक समस्या इ.सारख्या अनेक घटकांचा विचार करता विविध प्रकारच्या सेवांचे आयोजन ग्रंथालयांना करावे लागत आहे.
Step-by-step explanation:
hope it helps.
plz mark me as a brainliest.