India Languages, asked by shankarpatil, 1 year ago

50 mhani body parts in Marathi

Answers

Answered by minal85
23
१) आधी पोटोबा मग विठोबा
२) आपलेच दात अन् आपलेच ओठ
३) उचलली जीभ लावली टाळ्याला
४) ओठात एक पोटात एक
५) ऐकावे जनाचे करावे मनाचे
६) ज्याच्या हाती ससा तो पारधी
७) कानामागून अाली नि तिखट झाली
८) डोळा तर फुटू नये, काडी तर मोडू नये
९) आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे
१०) आपली पाठ आपणास दिसत नाही
११) एका हाताने टाळी वाजत नाही
१२) काखेत कळसा गावाला वळसा
१३) दात कोरून पोट भरत नाही
१४) तोंड धरून बुक्कयांचा मार
१५) डोळ्यात केर अन् कानात फुंकर
१६) झाकली मूठ सव्वा लाखाची
१७) ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल
१८) कुडी तशी पुडी
१९) कान अाणि डोळे यांमध्ये चार बोटांचे ःतर
२०) अापले नाक कापून दुसर्याला अपशकुन
२१) अापल्या कानी सात बाळ्या
२२) अाले अंगावर तर घेतले शिंगावर
२३) एका कानाने ऐकावे दुसर्या कानाने सोडून द्यावे
२४) दुसर्याच्या डोळ्यांतील कुसळ दिसते, स्वतःच्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाही
२५) दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी
२६) पाय धू तर म्हणे तोडे केवढ्याचे?
२७) पायची वहाण पायीच बरी
२८) बावळी मुद्रा देवळी निद्रा
२९) बुडत्याचा पाय खोलात
३०) भित्याच्या पाठी ब्रम्हराक्षस
३१) मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये
३२) मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
३३) मारणार्याचे हात धरवतात पण बोलणार्याचे तोंड धरवत नाही
३४) नाकापेक्षा मोती जड
३५) नाक दाबले कि तोंड उघडते
३६) नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने
३७) बळी तो कान पिळी
३८) लहान तोंडी मोठा घास
३९) लाथ मारीन तिथे पाणी काढीन
४०) या बोटांची थुंकी त्या बोटांवर
४१) हसतील त्याचे दात दिसतील
४२) हात ओला तर मित्र भला
४३) हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे
४४) हातच्या कंकणाला आरसा कशाला?
४५) या हाताचे त्या हातावर
४६) नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा
४७) संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी
४८) भटाला दिली ओसरी भट पाय पसरी
४९) शेंडी तुटो की पारंबी तुटो
५०) गोगलगाय आणि पोटात पाय
Similar questions