Environmental Sciences, asked by vikysidhu8567, 9 months ago

不哭6经理,好了,28我लजकजंलंलसंयंतददंदद्तै

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

‘‘अगदी बरोबर गोप्या, बघितलंस हा संगतीचा वाईट परिणाम. एका सडक्या आंब्याच्या सान्निध्यामुळे इतरही आंबे नासके निघाले. आपल्या जीवनातही आपल्यासोबत नेमकं असंच होत असतं. वाईट प्रवृत्तींचा जर आपल्याला सहवास लाभला तर आपणही नकळतपणे त्या प्रवृत्तींना बळी पडतो. आपण खोटेपणाने वागायला लागतो. या सवयींमुळे आपली माणसं आपल्यापासून दुरावतात. शेवटी तूही तुझ्या त्या वाईट मित्रांच्या आहारी गेलास आणि पूर्वीचा सर्वाना हवाहवासा तुझा स्वभाव गमावून बसलास.’’

हरियाणातील फतेहाबाद हे एक प्रशस्त शहर, जे व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे. याच शहरात बुद्धीने कुशाग्र असलेले गोपालदास नावाचे एक सज्जन गृहस्थ आपल्या दहा वर्षाच्या नातवंडासोबत राहत असत. गोपू असं त्याचं नाव होतं. कामाच्या निमित्ताने त्याचे आई-वडील मात्र शहर सोडून बाहेरगावी स्थायिक झाले होते. तो आजोबांचा लाडका होता. स्वभावाने तो खोडकर पण, तितकाच गुणवान होता. अभ्यास तसेच खेळांमध्येही तो सर्वाच्या आघाडीवर असायचा. पण, अचानक त्याला काय झाले कुणास ठाऊक. त्याचे वागणे जरा विचित्र होत चालले होते. तो वाईट मित्रांच्या संगतीत राहू लागला. कधी न कुणाविरुद्ध अपशब्द काढणारा तो गोपू वर्गात दुस-यांच्या टिंगल टवाळक्या करू लागला. विनाकारण कुणाच्याही खोडय़ा काढण्यात त्याला खूप मजा येत असे. अभ्यासात होत असलेलं दुर्लक्ष आणि त्याच्या या बदललेल्या अनपेक्षित वर्तणुकीमुळे त्याचे आई-वडील अधिकच चिंतीत होत होते. त्यांनी गोपूला घरी येऊन आपल्यापरीने खूप समजाविण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. एके दिवशी गोपूच्या आजोबांना एक युक्ती सुचली. त्यांनी तडक बाजारातून काही आंबे, एक टोपली आणि एक सडका आंबा विकत घरी आणला आणि गोपूला म्हणाले, ‘‘गोप्या, या आंब्यांना टोपलीत व्यवस्थित भर. आणि त्यात हा सडलेला आंबाही टाकून ठेव. परवा ते आपल्याला खायचे आहेत.’’ आजोबांनी सांगितल्याप्रमाणे गोपूने अगदी तसेच केले. तिस-या दिवशी आजोबा गोपूला म्हणाले, ‘‘गोपू, चल ती आंब्यांनी भरलेली टोपली घेऊन ये.’’ त्यांच्या या वक्तव्यावर गोपू ती टोपली लगेच दिवाणखान्यात घेऊन आला. त्याने ती टोपली उघडून बघितली आणि आश्चर्याने आजोबांना म्हणाला, ‘‘आजोबा, हे काय? आतमधले सगळे आंबे त्या एका सडक्या आंब्यामुळे खराब झाले आहेत.’’

Similar questions