India Languages, asked by aayushwarrior2006, 8 months ago

6. इच्छा असेल तिथे मार्ग in marathi composition​

Answers

Answered by Anonymous
11

Answer:

आजचा विषय म्हटलं तर वेगळा म्हटलं तर आपल्यासाठी म्हणजे तमाम भारतीयांसाठी एकदम हॉट टॉपिक म्हणावा असा होता. विषय होता भ्रष्टाचार. भारतात गेली कित्येक वर्ष या मुद्दयावर चर्चा झडत आहेत, वादविवाद-वादंग सुरू आहेत आणि या भ्रष्टाचारावर मात करण्यासाठी तोडगा शोधण्याचा प्रयत्न दीर्घ काळ सुरू आहे. आमच्या आजच्या चर्चेचा हा विषय आहे म्हटल्यावर साहजिकच, भ्रष्टाचाराच्या या मुद्दयाकडे हार्वर्डमध्ये कशा प्रकारे पाहिलं जातं आणि त्याची हाताळणी ते कशी करतात, हे जाणून घेण्याची मला खूपच उत्सुकता होती. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आपल्याकडून जेवढे शक्य आहेत तेवढे मार्ग अवलंबिले आहेत. आपण अभिमान बाळगू शकतो असे आरटीआय म्हणजेच माहितीच्या अधिकाराचे शस्त्र यूपीए सरकारने आपल्या हाती दिले आहे. त्याच प्रकारे जन लोकपाल विधेयक देखील येऊ घातले आहे. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर या विषयाची हाताळणी कशा प्रकारे केली जाते ते जाणून घेण्याची मला उत्कंठा लागली होती.

आजचे आमचे मार्गदर्शक रोनाल्ड मॅक्लिन अबारोआ यांना भ्रष्टाचार निर्मूलन क्षेत्रातील एक अधिकारी व्यक्तीच म्हणावे लागेल इतका त्यांना यासंबंधीचा थेट आणि दांडगा अनुभव आहे. बोलिव्हियातील एक माजी महापौर असलेल्या रोनाल्ड यांनी अर्थमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली असून, त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूकही लढवली होती. सध्या ते जागतिक बँकेसोबत काम करत आहेत. भ्रष्टाचार निर्मूलनाविषयी स्वानुभवाचे बोल सांगताना त्यांनी आम्हाला तिथली परिस्थिती आणि त्यांनी केलेले बदल याविषयी विस्ताराने सांगितले. महापौर असताना निर्माण झालेल्या दोन पेचप्रसंगांची हाताळणी त्यांनी कशा प्रकारे केली याविषयी ते बोलत होते. त्यांनी महापौर म्हणून सूत्रे हाती घेतली तेव्हा बोलिव्हिया म्हणजे भ्रष्टाचाराची बजबजपुरीच होती. भ्रष्टाचाराने पूर्णपणे पोखरलेल्या तिथल्या व्यवस्थेमध्ये त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांना ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला ते तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर, आपल्या मुंबईतील वा अशाच प्रकारच्या समस्या असलेल्या आपल्याकडील काही महानगरांमधील परिस्थिती लक्षात घ्या. मुंबई महानगरपालिकेचा अकार्यक्षम कारभार आणि कधीही तिथल्या न संपणा-या भ्रष्टाचाराच्या प्रश्नांबद्दल माझा सातत्याने लढा सुरू असल्यामुळे, इतरत्र अशाच प्रकारच्या समस्यांना कसे तोंड दिले जाते याची माहिती घ्यायची मला उत्सुकता होती.

 

सर्वप्रथम त्यांनी तिथली परिस्थिती किती वाईट होती याची कल्पना आम्हाला दिली. तिकडची संपूर्ण यंत्रणा जणू कोलमडली होती, डोक्यावर कर्जाचा डोंगर निर्माण झाला होता. अशातच जागोजागी संप आणि आंदोलनं सुरू होती. त्यातच महापौर आणि अध्यक्ष वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे होते. (जसं आपल्याकडे महापालिकेत शिवसेना तर राज्यात काँग्रेसची सत्ता आहे) त्यांनी त्या परिस्थितीची तुलना अक्षरश: एखाद्या युद्धजन्य परिस्थितीशी केली. एकूण परिस्थितीचा आढावा घेतल्यावर त्यांनी अ‍ॅक्शन प्लॅन सुरू केला. एकीकडे कामगार संघटनांशी वाटाघाटी आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराचं पाणी सर्वाधिक कुठं मुरतंय याचा शोध ते घेऊ लागले. या यंत्रणेमध्ये व्यवहाराची सर्व सूत्रे केंद्रित असलेला रोखपाल अधिकारीच बेफाम भ्रष्टाचार करत होता. सर्व कंत्राटं आणि परवाने तो आपल्या मर्जीनुसार देत सुटला होता आणि स्वत: गब्बर होऊन बसला होता, हे त्यांच्या लक्षात आलं. नीट शोध घेतल्यानंतर कचरा व्यवस्थापन विभागातच (हेही आपल्या मुंबईप्रमाणेच) सर्वात जास्त भ्रष्टाचार होत असल्याचे त्यांच्या लक्षात आलं.

यानंतर त्यांनी तीन महत्त्वाची पावले उचलण्याचे ठरवले; तपासणी, धोरण आणि अंमलबजावणी. सर्वात आधी त्यांनी संपूर्ण यंत्रणेचे विकेंद्रीकरण केले. कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उभारण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचे पगार वाढवले. त्यांच्या या त्रिसूत्रीने त्यांनी संप्रू्ण यंत्रणेचा कायापालट करून टाकला. हे सर्व करत असताना रोनाल्ड कायम वृत्तसंस्थांच्या संपादकांशी संपर्कात राहिले. त्यांनी करप्रणाली अतिशय सुलभ केली आणि करांची संख्या १२६ वरून सात वर आणली. एखाद्याच्या मालमत्तेचे स्वयंमूल्यांकन करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. जेणेकरून लोकांना स्वत:चा उत्कर्ष स्वत: करण्याची संधी मिळाली.

एका सर्वार्थाने नकारात्मक अशा परिस्थितीशी त्यांनी केलेल्या मुकाबल्यामुळे या शहराचे भविष्यच बदलून गेले याकडे त्यांनी आमचे लक्ष वेधले. हा देश आणि परिस्थिती वेगळी वाटली तरी राजकीय द्रष्टेपणा आणि लोकसहभागासह इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी बाजी पलटवली हे लक्षात घ्यायला हवं. आपल्याकडेही अशीच परिस्थिती आहे. समस्या आहेत पण त्या का सुटत नाहीत, याची चिंता मला वाटते. किंबहुना त्या सोडवणं खरोखरच अशक्य आहे का?

या दिवसाचा शेवटही आम्ही कालचा आपत्कालीन व्यवस्थापनाचा खेळ खेळूनच केला. या वेळी आम्हाला अधिक समस्या देण्यात आल्या होत्या आणि त्या सगळ्या सोडवून आमच्या देशाला पूर्वपदावर आणायचे होते. यामध्ये आम्हाला काही प्रमाणात यश देखील मिळाले. पण आम्हाला आमचा लढा पुढे असाच सुरू ठेवायचा आहे कारण त्या वेळी आमच्या समोर एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचं संकट उभं ठाकणार आहे. या खेळामुळे एक गोष्ट मात्र आमच्या लक्षात आली आहे की, कुठल्याही पेचप्रसंगात एखाद्या नेत्याला त्या वेळचाच नव्हे तर खूप पुढचा विचार करावा लागतो आणि देशाचं भवितव्य डोळ्यांसमोर ठेवूनच निर्णय घ्यावे लागतात.

Similar questions