India Languages, asked by vnalbalwar, 5 months ago

. (अ) पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा :
(1) पत्रलेखन :
ज्ञानसाधना विदयालय, लोणावळा
स्थापना : १९९५
रौप्य महोत्सवी वर्ष
राहुल/राजश्री रुके
किंवा
विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने
ऑनलाईन शिक्षणात येणाऱ्या
अडचणी दूर करण्याविषयी
वर्गशिक्षिकांना विनंती पत्र लिहीत आहे.
देविका/देवेश करमरकर
आपल्या मैत्रिणीला/मित्राला
पत्र पाठवून ऑनलाईन
शिक्षणाची उपयुक्तता व
महत्त्व समजावून सांगत आहे.
किंवा

Answers

Answered by jassi1178
76

सध्या कोरोनाच्या जागतिक संकटामुळे शाळा बंद आहेत. शाळा सुरु करण्याजोगी परिस्थिती कधी निर्माण होईल, हे आज सांगता येणे कठीण आहे. शाळा सुरु झाल्याच तरी, सामाजिक अंतराचे नियम काय असतील आणि ते पाळून शाळा पूर्ववत चालवता येतील का, हेही सांगता येणे कठीण आहे. सरकारने शाळा ‘ऑनलाईन’ सुरु करायला परवानगी दिली आहे. अनेक शाळांनी कोणत्या ना कोणत्या पद्धतीचे, ऑनलाईन उपक्रम सुरु देखील केले आहेत. पण, या साऱ्याची पुढील दिशा काय असेल? याचा विचार गांभीर्याने करायला हवा.

आपल्याकडे मोबाईल, लॅपटॉप अशी उपकरणे वापरून, आपण अनेक गोष्टी करतो. पण या माध्यमांचा वापर करून शाळा किंवा कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक उपक्रम चालवणे, हे आपल्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. कोरोनामुळे लादल्या गेलेल्या सक्तीच्या सुटीमुळे हे ऑनलाइन माध्यम एकाएकीच आपल्या गळ्यात पडले. पण या ऑनलाईन शिक्षणाची आजची परिस्थिती काय आहे? त्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? ते आज कोणत्या प्रकारे वापरले जात आहेत? या सगळ्याचे भविष्य काय असेल? या प्रश्नांचा उहापोह करताना, सर्वात महत्त्वाचे म्हणजे या साऱ्यातून आपल्याला नक्की काय साध्य करायचे आहे? ते समजून घ्यायला हवे.

Similar questions