Hindi, asked by meenajain163, 4 months ago

अंधश्रदा hindi essay​

Answers

Answered by ak4904408
0

Explanation:

अंधश्रद्धा ही मानवी समाजाला मिळालेला एक अभिशाप आहे. अंधश्रद्धाळू माणूस आपली विचारशक्ती हरवून बसलेला असतो. ' श्रद्धा' ही मानवी जीवनातील एक अमूल्य ठेव आहे. आई, वडील, गुरुजन यांच्याविषयीची शब्दही खचितच अभिमानास्पद बाब आहे. पण कोणत्याही सध्याचा अतिरेक हा शेवटी अंधश्रद्धेत परिनीती होऊन समाजाला हानिकारक ठरतो. बुवा, साधू, महंत, महाराज यांच्याकडून फसवल्या गेलेल्या अनेक वार्ता आपल्या कानावर येतात, तेव्हा असं लक्षात येतं की, अजूनही आपल्या तथाकथित प्रगत समाजाला अंधश्रद्धेच्या निबिड अंधारात चाचपडत आहे. या विज्ञानाच्या युगात ही श्रद्धाळू मंडळी बुवांच्या चमत्कारावर विश्वास ठेवतातच कसा, हे कळत नाही.

अजूनही अंधश्रद्धेचा पगडा आमच्या समाजाला पूर्णपणे गेलेला नाही. पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिष दाखवून जंगलात सात जणांचा निर्गुण सहार करण्यात आला. ही घटना नुकतीच नागपूरमध्ये घडली. केवढी घृणास्पद गोष्ट, पैशाचा पाऊस शक्य असते, तर असे करू शकणाऱ्या बुवा स्वतः पाऊस पाडून श्रीमंत झाला नसता का ? तो पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पैसे का घेतो ? हा साधा प्रश्न आपल्याला पडत नाही. कारण पिढ्यानपिढ्या आमच्या समाजाच्या रक्तात अंधश्रद्धा भिनलेली आहे.

Answered by kumaripurnima8535
0

Explanation:

अंधश्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास

चुकीच्या पायावर उभी असलेली विचारसरणी

आजच्या मानवाने समुद्राचा तळ शोधला व आकाशाला गवसणी घातली

ग्रहमान, साडेसाती यात मानव अडकून पडला

आपल्या देशात या प्रथेचे प्रमाण जास्त आहे

याला स्वार्थी आणि समाजकंटक माणसे खतपाणी घालतात

मांजर आडवे जाणे टिटवी ओरडणे घुबडाचा घुत्कार हे अशुभ मानले जाते

नरबळी देणे, पशू बळी देणे यासारख्या अघोरी कृत्य

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शासनाने मजबूत कायदा करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे

विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाचा प्रसार होणे आवश्यक

समाज प्रबोधन करून लोकांच्या मनाचे परिवर्तन

विज्ञान संस्था मार्फत विज्ञान यात्रा भरणे

अंधश्रद्धेबद्दल अशी विचारसरणी कमी करण्याचा प्रयत्न

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक धार्मिक दृष्टिकोन

Similar questions