अंधश्रद्धा निर्मूलनासाठी श्री दातरंगे व श्री दाबोळकर यांचे योगदान स्पष्ट करा
Answers
Answer:
डॉ. नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे दीपस्तंभ असून, आव्हाने आणि संकटांना संधी मानून काम अधिक जोमाने करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.
'अंनिस'तर्फे डॉ. दाभोलकर यांच्या जन्मदिनी आयोजित ऑनलाइन राज्यव्यापी निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. जनमानसात विवेकवाद रुजवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बांधिल आहे. राज्यभरातील सर्व कार्यकर्ते कृतिशीलतेवर भर देऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम समर्पित भावनेने करीत आहेत. कार्यकर्त्यांनी सामाजिक चळवळीतील वारसाहक्क व घराणेशाहीचा प्रभाव झुगारून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.. दाभोलकर यांचा जन्मदिवस दरवर्षी 'विवेक जागरदिन' म्हणून साजरा केला जातो. राज्यभरातील चारशेहून अधिक कार्यकर्ते या ऑनलाइन निर्धार मेळाव्यात सहभागी झाले होते. पाटील म्हणाले, की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कामाचा आदर्श वस्तुपाठ दाभोलकरांनी घालून दिला. त्यांच्या कुशल आणि प्रगल्भ नेतृत्वात ही चळवळ वाढली. समाजप्रबोधनाचा ध्यास घेणारी समर्पित कार्यकर्त्यांची फळी दाभोलकर यांनी उभी केली.
'अंनिस'चे राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रदीप पाटकर, उत्तम कांबळे, डॉ. श्यामराव पाटील, महादेव भुईभार आदींची या निर्धार मेळाव्यास उपस्थिती होती. मेळाव्याची सुरुवात अभिवादन गीताने झाली. माधव बावगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. परेश शहा, विनायक साळवे यांनी संघटनावाढीबाबत मार्गदर्शन केले. डॉ. ठकसेन गोराणे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेखा भापकर यांनी आभार मानले.
Explanation: