English, asked by pravingadekar2284, 2 months ago

आंब्याला फलांचा राजा का म्हणतात?​

Answers

Answered by ItzMissPayal
4

Answer:

hlo

Explanation:

i hope is helpful dear

Mark mi brilliant

Attachments:
Answered by satyamrajput83317
3

Answer:

आंबा हा फळांचा राजा आहे, असे म्हणतात. इतका सर्वप्रिय, सर्वार्थांनी मधुमधुर असा दुसरा कोणता ‘राजा’ भूतलावर असेल असे वाटत नाही. आंबा सर्वांना आवडतो. त्यामुळे यंदा आंबा रुसला या बातमीनेच बहुसंख्य लोक हिरमुसले झाले.

आपल्या समर्थ रामदासस्वामींनाही आंबा फार आवडायचा. खरे म्हणजे ते कमालीचे विरक्त. पण आहारामध्ये चोखंदळ होते. पण त्या चोखंदळपणाचा आपल्या आत्मिक उन्नतीत अडथळा होऊ नये यासाठी समर्थ फार जपत. या विषयातील खिरीची गोष्ट प्रसिद्धच आहे. समर्थांना आंबा किती आवडत असावाॽ त्यांनी आंबा या विषयावर आंब्यासारख्याच सुमधुर अशा अठरा ओव्या लिहिल्या आहेत. ऐका ऐका थांबा थांबा। कोण फळ म्हणविले बा। सकळ फळामध्यें आंबा। मोठे फळ॥ त्याचा स्वाद अनुमानेना॥ रंग रुप हें कळेना। भूमंडळी आंबे नाना। नाना ठाई॥ आंबे किती नानाप्रकारचे उपलब्ध आहेत, त्याचा तपशील समर्थ यापुढे देतातः मावे हिरवे सिंधुरवर्ण। गुलाली काळे गौरवर्ण। जांभळे ढौळे रे नाना जाण।पिवळे आंबे॥ आंबे येकरंगी दुरंगी। पाहो जातां नाना रंगी। अंतरंगी बाहेरंगी। वेगळाले॥ आंब्याचे आकार किती विविध आहेत, काही आंबे टणक तर काही लोण्यासारखे मऊ. काही आंबे बडिशेपच्या तर काही कोथिंबिरीच्या वासाचे, असे समर्थ नोंदवून ठेवतात. आंबे वाटोळे लांबोळे।चापट कळकुंबे सरळे। भरीव नवनीताचे गोळे। ऐसे मऊ॥ नाना फळांची गोडी ते। आंब्यामध्ये आडळते। सेपे कोथिंबिरी वासाचे। नानापरी॥ केवळ आंब्याच्या वासानेच माणसाला सुख लाभते, आनंद वाटतो. आपण तर एका सुवासिक तांदळालाच आंबेमोहोर असे नाव दिले आहे. आंब्याचा मोसम नसतानाही आंब्याचा वास मात्र लाभावा, असा हेतू त्यामागे असावा.

Similar questions