(आ) रसग्रहण :-
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा:
हृदय बंदिखाना केला! आंत विठ्ठल कोंडिला ||
Answers
Answered by
4
Answer:
प्रस्तुत ओळी या 'धरीला पंढरीचा चोर' या संत जनाबाईंच्या काव्यातील आहेत.
संत जनाबाई हे विठ्ठलाला म्हणजे परमेश्वराला कैद करण्यासाठी आपल्या भक्तीचा वापर करतात. जनाबाई म्हणतात की, ज्याप्रमाणे चोराला तुरुंगात कैद करतात त्याचप्रमाणे मी देखील माझ्या भक्तीच्या जोरावर परमेश्वराला कैद करून ठेवेल म्हणजे त्याच्यातील आणि माझ्यातील अंतर कमी होईल. मी माझ्या प्रेमाने व भक्तीने विठ्ठलाला माझ्या हृदयात बंद करून ठेवेन. माझे हृदय जणू बंदिखाना करून टाकेल आणि त्यात भगवंताला म्हणजे परमेश्वराला, विठ्ठलाला कोंडून ठेवेल असे संत जनाबाई म्हणतात. विठ्ठलाबद्दल असणारी त्यांची भक्ती आणि त्या भक्तीमुळे मिळालेला अधिकार वरील काव्यातून स्पष्ट होतो.
Similar questions