Geography, asked by vishalshinde5569, 5 months ago

आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही
कोणकोणते बदल कराल?​

Answers

Answered by ramkrishnapally177
19

Answer:

१८०० रेखावृत्तावरील एक काल्पनिक रेषा. १८०० रेखावृत्त पॅसिफिक महासागरातून जाते; ते ज्या ज्या ठिकाणी जमिनीवरून जाते ती ठिकाणे टाळून, सर्वस्वी समुद्रावरून आणि होता होई तो १८०० रेखावृत्ताच्या अनुरोधाने जाणारी, अशी ही रेषा मानलेली आहे. तिच्या पूर्वेला उत्तर व दक्षिण अमेरिका तर पश्चिमेला आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे प्रदेश येतात. ही रेषा ओलांडून जाताना वाराचा बदल करण्याची प्रथा आहे.

पूर्वेकडे म्हणजे आशियाकडून अमेरिकेकडे जाताना ही रेषा ओलांडली, तर चालू असेल त्याच्या मागचा वार धरतात आणि पश्चिमेकडे, अमेरिकेकडून आशियाकडे किंवा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडकडे जाताना पुढचा वार धरतात. जहाजातून किंवा विमानातून एका बाजूच्या देशाकडून दुसऱ्या बाजूच्या देशाकडे जाताना वाराचा हा बदल करतात. या रेषेला ‘आंतरराष्ट्रीय वाररेषा’ असे म्हणतात.

मॅगेलन हा पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला खलाशी. तो १५१९ मध्ये आपल्या तीन जहाजांसह स्पेनहून निघून पृथ्वीभोवती पश्चिम दिशेनेच जात राहिला. वाटेत तो मृत्यू पावला. त्याचे काही खलाशी व दोन जहाजेही नष्ट झाली. उरलेले एक जहाज व काही खलाशी सु. तीन वर्षानी पुन: स्वदेशी पोचले; तेव्हा स्पेनमध्ये गुरुवार तारीख ७ सप्टेंबर होती. परंतु जहाजावरील खलाशांच्या हिशेबाने तो दिवस बुधवार ता. ६ सप्टेंबरचा होता. त्यांनी पश्चिमेकडे जाताना सूर्यावरून कालमापन केले होते आणि एकंदरीत ३६०० पश्चिमेकडे गेल्यानंतर त्यांच्या कालगणनेत एका दिवसाचा फरक पडला होता. ती एक दिवस मागे पडली होती. त्यांना मग स्पेनमधील कालगणनेशी आपली कालगणना जुळती करून घेण्यासाठी बुधवार ६ सप्टेंबरऐवजी गुरुवार ७ सप्टेंबर ही तारीख व वार धरावा लागला.

Answered by BRAINLYBOT1020
52

\Large\bold\red{उत्तर}\Rightarrow

आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना आम्ही खालील बाबींचा विचार करू.

1) पूर्वेकडे प्रवास करत जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली, तर आहे त्या वार व तारखेच्या मागचा वार व तारीख ग्राह्य धरू.

2) पश्चिमेकडे प्रवास करत जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली, तर आहे त्या वार व तारखेच्या पुढचा वार व तारीख ग्राह्य धरू.

Similar questions