India Languages, asked by saniyasandi17, 1 month ago

आ वासून उभे राहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा .

Answers

Answered by mayanksaha9125
1

Answer:

शब्दशः होणा-या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात. यालाच कोणी वाक्संप्रदाय असेही म्हणतात.

मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.

हे वाक्यप्रचार म्हणजे वाक्यांश असतो, ते पूर्ण वाक्य नसते.

अवलंब करणे - स्वीकार करणे, आधार घेणे.

अकांड तांडव करणे (आकांड तांडव करणे) - रागाने आदळआपट करणे.

अंग चोरणे - अंग रारवून काम करणे.

अंग टाकणे - शरीराने कृश होणे, रोडावणे.

अक्कल पुढे करणे - बुद्धीचा भलताच उपयोग करणे.

अंगावर शेकणे - मोठी हानी शिक्षा म्हणून भोगावी लागणे, हानिकारक होणे.

अंगाचा तीळपापड होणे - अतिशय संताप येणे.

अंगाची लाही लाही होणे - क्रोधाने क्षुब्ध होणे, मनाचा जळफळाट होणे.

अंगावर मूठभर मांस चढणे - धन्यता वाटणे.

अंगावर रोमांच उभे राहणे (अंगावर काटा उभा राहणे) -भीतीने किंवा आनंदाने अंगावर शहारे येणे.

अग्निदिव्य करणे - कठीण कसोटीतून पार पडणे, प्राणांतिक संकटातून जाणे.

अंगवळणी पडणे - सवय होणे.

अंगावर मास नसणे - कृश होणे, प्रकृती खालावणे, खूप थकणे.

अंग शहारून टाकणे - अंगावर रोमांच उभे राहणे.

अंग चोरून बसणे (अंग मारून बसणे) - अवघडून बसणे.

अंगीकारणे - स्वीकारणे.

अंगाचा खुर्दा होणे - शरीराला त्रास होणे.

अंगावर घेणे - एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणे.

अंगाचे पाणी पाणी होणे - घाम येणे.

अंग मोडून काम करणे - खूप मेहनत करणे.

अंग काढून घेणे (अंग काढणे) - अलिप्त राहणे, संबंध तोडणे.

अंगाचा भडका उडणे - क्रोधामुळे अंगाची आग आग होणे.

अंतर देणे - सोडून देणे, त्याग करणे.

अंग झाडून मोकळे होणे - संबंध तोडणे.

अंगात त्राण नसणे - अंगातील शक्ती नाहीशी होणे.

अंगाने चांगला आडवा असणे - सशक्त असणे.

अंगात कापरे सुटणे - भीतीने थरथरणे.

अंगावर धावून येणे - मारावयास येणे.

अंगावर तुटून पडणे - जोराचा हल्ला करणे.

अटकेपार झेंडा लावणे - फार मोठा पराक्रम गाजविणे.

अटीतटीने खेळणे - चुरशीने खेळणे.

अठरा विश्वे दारिद्र्य असणे - अतिशय गरिबी असणे.

अडकित्त्यात सापडणे - पेचात सापडणे, मोठ्या अडचणीत सापडणे.

Similar questions