Aabhar mananre letter in Marathi
Answers
Answered by
2
कोणाला आभार मानायचे आहेत या वर अवलंबून आहे पत्र
Answered by
6
■ अभ्यासासाठी मार्गदर्शन केल्यामुळे मोठ्या भावाचे आभार मानणारे पत्र■
गुरुकुल निवास,
जी.टी.रोड,
रामनगर,
पुणे.
दि : २७ मार्च,२०२०.
प्रिय दादा,
सप्रेम नमस्कार.
तू कसा आहेस? मी येथे ठीक आहे. मी आशा करते की तू सुद्धा ठीक असशील.
दादा, मला या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. मला माहित आहे की ही बातमी ऐकून तुला खूप आनंद होईल. माझ्या या यशात सर्वात मोठे योगदान तुझेच आहे. माझ्या अभ्यासामध्ये तू मला खूप मदत केली आहेस.
गणितातील तुझ्या नोट्समुळे मला खूप मदत मिळाली.तू मला मेहनतीने अभ्यास करण्यास प्रेरित केले.तुझ्या मार्गदर्शनामुळे मी माझा अभ्यास चांगल्या प्रकारे व वेळेवर करू शकली.
मला मदत केल्याबद्दल मी तुझे आभारी आहे. नेहमी मला असे मार्गदर्शन करत रहा.
आई बाबांना माझा नमस्कार सांग.
तुझी बहीण,
प्रीती.
Similar questions