India Languages, asked by TransitionState, 1 year ago

आचार्य विनोबा भावे – मराठी माहिती, निबंध, भाषण, परिच्छेद...

Answers

Answered by halamadrid
2

Answer:

विनायक नरहरी भावे म्हणजेच आचार्य विनोबा भावे यांचा जन्म कोकणमधील रायगड जिल्ह्यातील गागोदे गाव येथे ११ सेप्टेंबर,१८९५ रोजी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव नरहररी शंभु राव तर आईचे नाव रुक्मिणी देवी असे होते.

ते एक समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक होते.महात्मा गांधी यांचे ते अनुयायी होते.गांधींसारखेच त्यांनीही अहिंसेचा मार्ग निवडला.गरीब आणि समाजातील मागासलेल्या लोकांच्या हक्कासाठी लढण्यात त्यांनी आपले जीवन व्यतीत केले.

त्यांना भूदान चळवळीमुळे प्रसिद्धि मिळाली. भारताचे राष्ट्रीय शिक्षक म्हणून त्यांना ओळखले जात असे.रॅमन मैगसेसे पुरस्कार मिळवणारे ते पहिले व्यक्ति होते.त्यांना भारत रत्न सुद्धा मिळाले.परंतु आजारामुळे,१५ नोव्हेंबर,१९८२ रोजी या महान समाजसुधारकाचे निधन झाले.

Explanation:

Answered by jitendrakumarsha2432
9

Answer:

आचार्य विनोबा भावे माहिती, निबंध, भाषण, लेख मराठीमध्ये

विनोबांचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ राजी रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात गागोदे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे पूर्ण नाव नरहरी शंभुराव भावे असे होते. त्यांच्या आईचे नाव रखुमाबाई नरहर भावे असे होते. विनोबांचे स्वतःचे पूर्ण नाव विनायक नरहरी भावे असे होते. आचार्य विनोबा भावे या नावाने ते प्रसिद्ध होते. भावे कुटूंबात ते जन्माला आले.

भावे कुटुंबाला जणू विरक्तीचा जणू वारसाच होता. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. विनोबांना धाकटे तीन भाऊ व एक बहीण होती. त्यांचे दोन भाऊ शिवाजी व बाळकृष्ण आजन्म ब्रम्हचारी राहून लोकसेवा व्रताने गांधींच्या आश्रमीय जीवनाशी समरस झाले होते. विनोबा हे सर्वात मोठे होते. विनोबांची आई तर अत्यंत परोपकारी आणि धार्मिक वृत्तीची होती. विनोबांच्या आजोबांनी आपल्या उत्तर आयुष्यात अग्निहोत्र घेतले होते. यामुळे विनोबांची वृत्ती विरक्त झाली व ते आजन्म ब्रम्हचारी राहिले.

Similar questions