Hindi, asked by aadityathakur104, 11 months ago

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र

Answers

Answered by halamadrid
22

■■वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आईला लिहिलेले पत्र:■■

झिपरु सदन,

एन. एम.मार्ग,

बोरीवली(पू)

दिनांक: १८ मार्च,२०२०.

तीर्थरूप आईस,

सप्रेम नमस्कार.

कशी आहेस तू? मी इथे ठीक आहे.

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू नेहमी सुखात रहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते.बाबांच्या पत्राद्वारे कळाले की यावेळी तुझा वाढदिवसा सगळ्यांनी खूप मजेत आणि आनंदात साजरा केला.आपल्या कुटुंबातील सगळे लोक घरी पार्टीसाठी आले होते.

मला ही या पार्टीमध्ये सहभागी व्हायचे होते,परंतु परिक्षेमुळे मला ते जमले नाही.मी तुझ्या वाढदिवसाला येऊ शकली नाही,या गोष्टीबद्दल मला वाइट वाटते.पण, मी आता दिवाळीच्या सुट्टीत घरी येणारच आहे.

पुन्हा तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.नेहमी खुश रहा.सोबत तुझ्यासाठी भेट पाठवत आहे. बाबांना माझा नमस्कार सांग.

तुझी लाडकी,

मीणा.

Similar questions