Hindi, asked by saloni1304, 1 year ago

आजीचे मनोगत composition in Marathi​

Answers

Answered by halamadrid
31

■■ आजीचे मनोगत■■

कसे आहात मुलांनो? मी तुमची आवडती, तुमचे खूप लाड करणारी तुमची 'आजी' बोलत आहे.

मी माझ्या कुटुंबासोबत पुण्यात राहते. माझ्या कुटुंबात माझी दोन मुले, दोन सुना आणि दोन नातवंड असतात. आम्ही सगळे आनंदाने व सुखाने राहतो.

माझ्या कुटुंबातील सगळे लोकं माझ्यावर खूप प्रेम करतात, माझा आदर करतात. त्यांचे माझ्यावर असलेले प्रेम पाहून मी खूप आनंदी होते. मला माझ्या नातवंडांसोबत खेळायला फार आवडते. मी बनवलेले जेवण माझ्या घरातल्या सगळ्यांनाच खूप आवडतो.

मी संध्याकाळी आमच्या घरासमोर फेरफटका मारायला जाते. तेव्हा, मी माझ्या मैत्रिणींना भेटते. माझ्या काही मैत्रिणी त्यांच्या घरात खुश नाहीत. त्या मला सांगतात की त्यांची मुले त्यांच्याशी नीट वागत नाही, त्यांच्यासोबत उद्धटपणे बोलतात. ते ऐकूण मला वाईट वाटते.

मी अशा मुलांना हेच सांगेल की, आम्ही तुम्हाला लहाणाचे मोठे करतो. तुम्हाला जीवनात योग्य मार्ग दाखवतो. तेव्हा तुम्ही आमच्याशी वाईट वागू नका.

पण, मी स्वतःला भाग्यवान समझते की मला खूप चांगले कुटुंब मिळाले आहे.

चला, आता नंतर बोलू.

Similar questions