आजचा time-pass खाली दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील ठिकाणे ओळखा । १ बाग आहे पण फुले नाहीत २ वहात्या पाण्याचा थांबा ३ सांगायला दगड पण आहे गाव ४ थकल्या भागल्यांची वाडी ५ मदतीचा हात पुढे करणारे ६ ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको ७ आडवी तिडवी वस्ती ८ लहान पाखरू ढेरी मोठी ९ फाॅरेनची गल्ली १० थोर नेत्याच्या पदवीची वसाहत होती ११ कवडी कवडीने संपत्ती मिळवली १२ मिठाई वाला हनुमान १३ बेवडा ब्र�ज १४ पिडाकारी दैवताचा ओटा १५ हार आहे तोही दगडाचा १६ याचे थालीपीठ होत नाही १७ नकार देणारी पेठ १८ नमुनेदार वसाहत १९ या बागेत सुवर्ण लंकार नाहीत २० इथे बांगडीवाले आहेत का हो? २१ कोंढाणा जिंकायला हिने मदत केली २२ गिळंकृत करणारे मास्तर २३ सगळे इथे एेटीत २४ सुगंधित नगर २५ हा भितीदायक पट्टा आता चांगलाच सुधारलाय!
Answers
Answer:
Which language is this
सर्व प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे असतील…
१. बाग आहे पण फुले नाहीत ▬► तुळशी बाग
२. वहात्या पाण्याचा थांबा ▬► नळ स्टॉप
३. सांगायला दगड पण आहे ▬► गाव खडकी
४. थकल्या भागल्यांची वाडी ▬► विश्रांतवाडी/विश्राम नगर
५. मदतीचा हात पुढे करणारे ▬► सहकारनगर
६. ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको ▬► शनिवार वाडा
७. आडवी तिडवी वस्ती ▬► वाकडी गल्ली
८. लहान पाखरू ढेरी मोठी ▬► चिमण्या गणपती
९. फाॅरेनची गल्ली ▬►हाँगकाँग लेन
१०. थोर नेत्याच्या पदवीची वसाहत होती ▬► बॅरिस्टर वाडी
११. कवडी कवडीने संपत्ती मिळवली ▬► धनकवडी
१२. मिठाई वाला हनुमान ▬► जिलब्या मारूती
१३. बेवडा ब्रीज ▬►दारूवाला ब्रीज
१४. पिडाकारी दैवताचा ओटा ▬► शनीपार
१५. हार आहे तोही दगडाचा ▬► खडकमाळ
१६. याचे थालीपीठ होत नाही ▬► विद्यापीठ
१७. नकार देणारी पेठ ▬►नाना पेठ
१८. नमुनेदार वसाहत ▬►माॅडेल काॅलनी /आयडियल काॅलनी
१९. या बागेत सुवर्ण लंकार नाहीत ▬► मोतीबाग/हिराबाग
२०. इथे बांगडीवाले आहेत का हो? ▬►कासारवाडी
२१. कोंढाणा जिंकायला हिने मदत केली ▬► यशवंती /घोरपड
२२. गिळंकृत करणारे मास्तर ▬► हडपसर
२३. सगळे इथे ऐटीत ▬► हिंजवडी
२४ सुगंधित नगर ▬► चंदन नगर
२५ हा भितीदायक पट्टा आता चांगलाच सुधारलाय ▬► मगरपट्टा
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
इतर काही मनोरंजक कोडे....►
अशी कोणती वस्तू आहे जी समोरुन देवाने बनवली आहे अणि माघून मानसाने बनवली आहे?
https://brainly.in/question/5207438
═══════════════════════════════════════════
कोडी- ओळखा पाहू मी कोण?
१. पुरूष असून पर्स वापरतो
वेडा नसून कागद फाडतो
असा माणूस कोण ?
२. पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कसं हिरवं
कात नाहि, चुना नाही, तरी तोंड कसं रंगल?
३. बत्तीस चिर्यांमधे नागिण फिरे
४. खण खण कुदळी, मण मण माती
इंग्रजांनी राज्य घेतले मध्यराती
५. हरीण पळतंय, दूध गळतयं
६. एव्हढिशी नार, तिचा पदर फार
७. सुपभर लाह्या, त्यामध्ये रुपया
८. चार आले पाहुणे, चार केले घावणे
प्रत्येकाच्या तोंडात दोन दोन
९. इतकासा गडू पाहुन येते रडू
१०.लाल पालखी हिरवा दांडा
११.कोकणातनं आला भट
धर की आपट
१२.हिरवी पेटी काट्यात पडली
उघडून पाहिली तर मोत्याने भरली
१३.सगळे गेले रानात
अन् झिपरी पोरगी घरात
१४.काळ्या रानात हत्ती मेला त्याचा प्रुष्टभाग ऊपसून नेला.
१५. आकाशातून पडली घार
तिला मारून केलं ठार
रक्त प्यायलं घटाघटा
मांस खाल्लं मटामटा
१६.घम घम घमाटा
विषाचा काटा
सोन्याच्या देवळात
रुप्याच्या घंटा
१७.घाटावरनं आल्या बाया
त्यांच्या सुरकुतल्या काया
१८.तीनजण वाढायला बाराजण जेवायला
१९.लाल आहे पण रंग नाही, कृष्ण आहे पण देव नाही, आड आहे पण पाणी नाही, वाणी आहे पण दुकान नाही.
२०.घड्याळातला असा कोणता काटा आहे जिथे दोन्ही काटे आले कि तितकेच वाजायला तितकेच कमी असतात..?
https://brainly.in/question/16254655
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○