Aaji mhanje ghracha Aadhar
Answers
Answer:
आजी म्हणजे घराचा आधार ........
घरात सर्व व्यक्ती महत्वाचे असतात , आई वडील , बहीण , भाऊ आणि आजी आजोबा . आई हि घरातील सर्व काम पाहत असते , वडील घराचे आधारस्तंभ असतात आणि आजी आजोबा घराचे मार्गदर्शक असतात .
आजी घरात काही काम करो अथवा न करो परंतु तिला प्रत्यक्ष कामाचा अनुभव आलेला असतो . तीला सर्व कामे कसे आणि केव्हा करायचे हे तिला माहित असते.
आपण आपल्या रोजच्या कामांमधून थोडा वेळ आजी आणि आजोबा सोबत घालवला पाहिजे आपण
त्यांच्या कडून खूप काही शिकू शकतो . आपल्याला शाळेत आणि घरी आणि इतर ठिकाणी हि सतत सल्ला मिळतो कि नेहमी आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तींचा आदर आणि सन्मान केला पाहिजे कारण आपण आयुष्यमध्य कितीही कमवले किंवा कितीही पुढे गेलो तरी जे अनुभव आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तींना असतात ते आपल्याला कमी वयात मिळवता येत नाहीत .
आजी घरातील छोट्या छोट्या कामावर लक्ष देत असते . आपल्याकडून काही चूक होऊ नेय याची काळजी हि ती घेत असते . आजी कामासोबतच घरातील सर्व व्यक्तींची हि काळजी घेत असते . ती सगळ्यांचे मन ओळखण्यास सक्षम असते .
आपण आजी - आजोबा चा सन्मान केला पाहिजे . आजच्या युगामध्य मूळ कामामध्य एवढे व्यस्त असतात कि ते आपल्या आली - वडिलांना आणि आजी आजोबाना विसरून जातात . अशी परिस्थिती तयार होण्यामागे मोबाइल आणि इंटरनेट याचा हि वाटा आहे . आपण आपले संकृती जोपासली पाहिजे ,