Hindi, asked by vs0112mumbai, 9 months ago

आकिमीडीज या शास्त्रज्ञाबाबत तुम्हाला माहित असलेली माहिती लिहा.​

Answers

Answered by Anonymous
1

तरफेचा शोधही आर्किमिडीज यांनी लावला. ‘‘सुयोग्य टेकू, आणि पुरेशी लांब काठी मला दिल्यास मी पृथ्वीसुद्धा तरफेचा साहाय्याने उचलून दाखवेन’’, हे त्यांचे विधान प्रसिद्ध आहे. पाणी उपसून काढण्याचे यंत्र म्हणजेच ‘आर्किमिडीजचा स्क्रू’ हाही त्यांचाच शोध.

एखाद्या पदार्थाचे तो द्रवात बुडालेला असताना केलेले वजन, हे त्याच्या हवेतील वजनापेक्षा कमी भरते. हे कमी झालेले वजन त्या पदार्थाने बाजूला सारलेल्या द्रवाच्या वजनाइतके कमी होते. यालाच ‘आर्किमिडीजचा सिद्धांत’ असे म्हणतात.आर्किमिडीजचा सिद्धांत अधिक व्यापक रीतीने पुढीलप्रमाणे मांडता येईल. कोणताही पदार्थ द्रवात अंशत: अथवा पूर्णत: बुडालेला असेल तर तो द्रवव्याप्त भागाने विस्थापित केलेल्या द्रवाच्या वजनाएवढय़ा बलाने, वरच्या बाजूस प्लावित (ढकलला) केला जातो, आर्किमिडीजच्या या तत्त्वानुसार घेतलेल्या द्रवात न विरघळणाऱ्या व त्या द्रवापेक्षा जड पदार्थाची घनता काढता येते.

सोनाराने बनविलेल्या मुकुटात शुद्ध सोन्यात चांदीची भेसळ असल्याचा सेरक्यूजचा राजा हिरो यांस संशय आला व त्याची शहानिशा करण्याचे काम त्याने आर्किमिडीज यांच्याकडे सोपविले. यावर विचार करीत असताना स्नानगृहात काठोकाठ भरलेल्या घंगाळात बसून आंघोळ करताना त्यांना ही कल्पना सुचली व तसेच युरेका! युरेका!! ओरडत राजदरबाराकडे त्यांनी धाव घेतली. यातूनच या सिद्धांताचा शोध लागला अशी आख्यायिका आहे.

वर्तुळाचे क्षेत्रफळ, गोलाचे घनफळ आणि गोलाचे पृष्ठफळ, ही तिन्ही सूत्रे आर्किमिडीजनी शोधली.

आर्किमिडीजच्या मृत्यूची गोष्टही हृदयस्पर्शी आहे. सेरेक्यूज जिंकल्यानंतर रोमन सनिक शहरात घुसून घातपात-विध्वंस करत असतानाही आर्किमिडीजला त्याचा काहीच पत्ता नव्हता. ते वाळूवर वर्तुळे काढून त्यासंबंधित गणितांच्या विचारात मग्न असताना एका सनिकाची सावली त्यावर पडली आणि ते उद्गारले, ‘‘माझ्या वर्तुळांपासून दूर हो.’’

l hope it will help u ☺️☺️☺️

Answered by Anonymous
2

Answer:

♠️ I HOPE HELP YOU ♠️

Explanation:

  • आकिमीडीज या शास्त्रज्ञाबाबत तुम्हाला माहित असलेली माहिती लिहा.
Similar questions