History, asked by arskgrsd5692, 1 year ago

आकाशवाणी हे नाव कसे पडले?

Answers

Answered by ksk6100
10

आकाशवाणी हे नाव कसे पडले?

उत्तर:-  

१) १८७६ मध्ये दूरध्वनीचा शोध ग्रॅहम बेल यांनी लावला. या शोधामुळे तारेच्या माध्यमातून शब्द एकठिकाणावून दुसऱ्या ठिकाणी ऐकू येऊ लागला.  

२) १८९६ मध्ये इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी बिनतारी संदेश यंत्रणाचा शोध लावला.  

३) १९२१ मध्ये अमेरिकेतील पिटर्सबर्ग येथे जगातील पहिले आकाशवाणी केंद्र स्थापन झाले.

४) १९२२ मध्ये ब्रिटिश ब्रॉडकास्टींग कंपनी स्थापन झाली.  

५) आकाशवाणीचा प्रारंभ भारतात मद्रास येथे झाला.  

६) आकाशवाणीला प्रथम नभोवाणी म्हटल्या जायचे.  

७) १९३५ मध्ये म्हैसूर संस्थेने आपल्या रेडिओ केंद्रास 'आकाशवाणी ' असे नाव दिले.  

८) ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी असे नाव दिल्या गेले,  हेच नाव पुढे भारत सरकारने सर्व रेडिओ केंद्रांना दिले.

Similar questions