आली आली दिवाळी आली
निबंध लेखन
Answers
Answer:
दिवाळी निबंध मराठी मध्ये
Explanation:
विद्यार्थ्यांना शाळेत असताना उत्सव सण याविषयी निबंध लेखन असते. दिवाळी हा मराठी संस्कृती मिळेल सर्वात मोठा आनंदाचा रोषणाईचा उत्सवाचा उत्सव आहे याविषयी आपण निबंध पाहणार आहोत सदर निबंध इयत्ता पहिली दुसरी चौथी ते सहावी सातवी दहावीपर्यंत कुणालाही उपयुक्त आहे. सदर निबंध तुमच्या लेखनाला निश्चितच सहाय्यक ठरेल चला तर मग निबंधाला सुरुवात करुया
दिवाळी निबंध मराठी: आपण भारतीय सण साजरे करतो. वर्षातून एकदा येणारा हा चार दिवसांचा मोठा सण दिवाळी आहे !. दिवाळीचे नाव घेताच आपल्याला आनंद वाटतो. दिवाळी हा दिव्यांचा सण ! दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दिवाळी येते. या सुमारास शेतीची कामे संपलेली असतात. दिवाळी जवळ आली की सगळे जण आपापली घरे स्वच्छ करतात व सजवतात. आई छान छान फराळाचे पदार्थ बनवणे. लाडू, चकल्या, शंकरपाळे आणि चिवडा, करंज्या हे दिवाळीचे खास पदार्थ असतात. लहान मुलांना नवीन कपडे मिळतात. घरात पाहुणे येतात. घरासमोर आकाशकंदील टांगतात. तसेच अनेक पणत्या लावतात. दारासमोर रांगोळी काढतात.
दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे माझ्या एकदम आवडीचा दिवस तो म्हणजे भाऊबिजेचा. भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ आणि देतो. असा हा दिवाळीचा सण घराघरातून आनंदाने साजरा केला जातो