आमची सहल मराठी निबंध
Answers
Answer:
मी सातवीत असताना आमची सहल अंबरनाथ येथील शांतीसागर रिसॉर्ट येथे आयोजित केली गेली होती.वर्गात सहलीचा कार्यक्रम जाहीर होताच आम्ही सगळे पोरं आनंदाने ओरडलो.सहलीला काय काय करायचे,याचा विचार करू लागलो.सहलीच्या एक दिवस आगोदरच मी बॅग भरून घेतली,खाऊसुद्धा भरले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले. मझी आई मला शाळेत सोडायला आलेली.सगळ्या मैत्रिणींना भेटल्यावर खूप मजा आली.आम्ही सगळे बस मध्ये बसलो.
बस मध्ये आम्ही अंताक्षरी खेळायला लागलो,तेव्हा वर्गशिक्षिकाही आमच्यात सामील झाल्या.
रिसॉर्टला पोहोचल्यावर आमचा उत्साह अजून वाढला.आम्ही स्विमिंग पूल मध्ये खूप मजा केली.वेगवेगळ्या घसरगुंड्यांवर बसून पाण्यात जायची मज्जाच वेगळी होती.तिथे आम्ही खूप धमाल केली.
थोड्या वेळाने तिथून निघायची वेळ झाली.आम्हाला जवळ असलेल्या पार्लेजीची फैक्ट्री सुद्धा दाखवली गेली. बिस्किट कसे बनवतात याची माहिती दिली गेली.तो आमच्यासाठी एक वेगळाच अनुभव होता.निघताना प्रत्येकाला एक बिस्किटचा पुडा दिला गेला.नंतर आम्ही घरी यायला निघालो.
घरी यायला रात्र झाली आणि अशी ही आमची मजेदार सहल कशी संपली, काही कळालेच नाही.
Explanation: