आमची सहल यावर निबंध
it's urgent
Answers
Answer:
दर वर्षी श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी आमच्या शाळेची सहल निघते. सहलीची आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहात असतो. नेहमीप्रमाणे ट्रीपला जाण्याचा दिवस उजाडला. एस.टी. भल्या सकाळीच आली. जेवणाचा डबा, पाणी घेऊन, दंगामस्ती करीत रांगेनं आम्ही गाडीत चढलो. नागमोडी वळणे घेत सह्याद्रीच्या रांगांमधून एस.टी. सुसाट पळत होती. जणू तिलाही आम्हाला लवकरात लवकर माळशेज घाटात घेऊन जायचे होते. दोनच तासांत आम्ही पोहोचलोही.
त्या दिवशी खरं तर पावसाचा मागमूसही नव्हता, तरी आभाळ भरून आले. विजा चमकू लागल्या. वारे आडवे तिडवे वाहू लागले. घाटमाथ्यावरचं नी खोलखोल दरीतलं चित्र क्षणात बदललं. काळ्या ढगांच्या झुंडी पर्वतांवर झेपावू लागल्या. एक थेंब, दोन थेंब करीत टपटप पाऊस पडू लागला. पावसाची सर आम्हीही अंगाखांद्यावर खेळवली. ताजेतवाने वाट लागले. पाऊस वाढला, तसे तेथील शंकराच्या देवळाचा दाटीवाटीने आसरा घेतला. तासाभराने देवळातून बाहेर आलो तर...