आमचा वर्ण काळा असला तरी अंतरंग दयावंत आहे swamat liha
Answers
Answer:
मंडेलांच्या ठिकाणी केवळ लढाऊपणाच नाही तर त्या लढाऊपणाचे समर्थन करण्याची वैचारिक क्षमता आहे; व्यापक बंधुभावाचा, समजुतदारपणाचा, त्यांच्या ठायी अकलंकित झालेला स्रोत आहे; आपल्यावर आणि आपल्या संघटनेवर दक्षिण आफ्रिकी शासनाने केलेले निर्घृण आघात विसरून आपल्या उच्चारांत किंवा आचारांत जरादेखील कटुता आणू न देणारा थोरपणा आहे, हे लक्षात आल्यावर त्यांच्या चाहत्यांच्या आदरभावात एका वेगळ्याच आनंदाची भर पडली.
आभाळामध्ये दाटलेल्या ढगांच्या आड लपलेला सूर्य त्या ढगांत जराशी फट पडताच एकदम प्रकट व्हावा आणि त्याच्या तेजाने खालचा सगळा आसमंत उजळून निघावा, तसे 11 फेब्रुवारी 1990 रोजी घडले. आपला सत्तावीस वर्षांचा अखण्ड बंदिवास संपवून व्हिक्टर व्हर्स्टर तुरुंगातून नेल्सन मंडेला बाहेर पडले मात्र, त्या क्षणापासून केवळ दक्षिण आफ्रिकेतच नव्हे तर सगळ्या जगातच, विशेषेकरून काळ्या जनतेत जणू एखाद्या नवीन युगालाच प्रारंभ झाला. त्या प्रसंगाचे वर्णन 'दिशः प्रसेदुर्मरुतो वदुः सुखाः' अशा काव्यमय शब्दांनी मला करता येईल; पण तसे करण्याचा मोह मी आवरून धरतो. याचे मुख्य कारण असे की खुद्द मंडेलांना अशा प्रकारची स्तुती आवडणार नाही. मंडेलांच्या सुटकेच्या आधीपासूनच त्यांच्याविषयीच्या वाढत्या आदराची चिन्हे चोहीकडे दिसू लागलेली होती.
1988 साली त्यांच्या वयाची सत्तर वर्षे पूर्ण झाली, म्हणून जगभर त्यांची जयंती साजरी करण्यात आली. ऑस्ट्रिया, ब्रिटन, अमेरिका अशा अनेक देशांतल्या सरकारांनी मंडेलांचे नाव अनेक प्रकारे सन्मानित केले होते. त्यांच्या सुटकेसाठी हजारो लोकांच्या सह्यांची निवेदने दक्षिण आफ्रिकी सरकारकडे रवाना झाली होती. भारताने तर 79 साली मंडेलांना नेहरू अॅवॉर्ड समर्पण केले होते; पण ते तुरुंगात असल्याने विनीला- म्हणजे त्यांच्या पत्नीला, मोठ्या सन्मानपूर्वक दिल्लीत आणून तिच्या हाती ते दिले होते.
मंडेलांची सुटका झाल्यानंतर तर ते सर्वच स्वातंत्र्यप्रेमी लोकांना हवेहवेसे वाटू लागले. दक्षिण आफ्रिकेतील काळ्यांच्या हक्क प्रस्थापनेसाठी त्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा अखिल मानव जातीच्या स्वातंत्र्याकरिता आणि समानतेकरिता चाललेल्या लढ्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे, याची जाणीव ज्या समाजांना आणि राष्ट्रांना झाली होती, त्यांनी नेल्सन मंडेलांच्याविषयी आपला आदरभाव व्यक्त करावा हे साहजिकच होते. मंडेलांच्या ठिकाणी केवळ लढाऊपणाच नाही तर त्या लढाऊपणाचे समर्थन करण्याची वैचारिक क्षमता आहे; व्यापक बंधुभावाचा, समजुतदारपणाचा, त्यांच्या ठायी अकलंकित झालेला स्रोत आहे; आपल्यावर आणि आपल्या संघटनेवर दक्षिण आफ्रिकी शासनाने केलेले निर्घृण आघात विसरून आपल्या उच्चारांत किंवा आचारांत जरादेखील कटुता आणू न देणारा थोरपणा आहे, हे लक्षात आल्यावर त्यांच्या चाहत्यांच्या आदरभावात एका वेगळ्याच आनंदाची भर पडली
Explanation: