आणि काश्मीर येथे सक्रिय असलेल्या काही दहशतवादी गटांची नावे व त्यांच्या नेत्यांची नावे लिहा.
Answers
Explanation:
जम्मू आणि काश्मीरमधील हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर ए तोयबा आणि जैश-ए मोहम्मद या तीन खतरनाक दहशतवादी संघटनांनी हातमिळवणी केली असून त्यामुळे सुरक्षा दलांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
जम्मू– जम्मू आणि काश्मीरमधील हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर ए तोयबा आणि जैश-ए मोहम्मद या तीन खतरनाक दहशतवादी संघटनांनी हातमिळवणी केली असून त्यामुळे सुरक्षा दलांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या तिनही संघटनांचे ३० दहशतवादी दक्षिण काश्मीरमध्ये एकत्र कारवाया करत असल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या ४५ सेकदांच्या या व्हीडिओत तीन संघटनांचे दहशतवादी एका जंगलात कॅमे-यापुढे हेतूपूर्वक चालताना दिसत आहेत. ‘हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए मोहम्मद या तिन्ही संघटनांचे दहशतवादी एकत्रितपणे कारवाया करत आहेत. मागील वर्षाच्या जुलै महिन्यापासून या संघटना एकत्रितपणे काम करत आहेत.
त्याआधी या तिन्ही संघटना स्वतंत्रपणे विविध भागांमध्ये दहशतवादी कारवाया करत होत्या,’ अशी माहिती लष्करी अधिका-याने दिली. ‘यापूर्वी हिजबुल मुजाहिद्दीन संघटना दक्षिण अनंतनाग, त्राल आणि शोपियानच्या दक्षिण पट्टय़ात सक्रिय होती. तर लष्कर ए तोयबाचे दहशतवादी कुलगाम, काकापोरा आणि पूर्व पुलवामा या परिसरांत दहशतवादी कारवाया करत होते. जैश-ए मोहम्मद संघटनाच्या कारवाया फक्त कमला फॉरेस्ट, शोपियानचा पश्चिम भागापुरत्या मर्यादित होत्या. मात्र आता असे कोणतेही भाग राहिलेले नाहीत,’ अशी माहिती सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिका-याने दिली.
दक्षिण काश्मीरमध्ये ‘हिजबुल’चे ८० दहशतवादी सक्रीय असल्याची माहिती सुरक्षा दलातील अधिका-यांनी दिली. यातील अनेक दहशवादी हे स्थानिक तरूण असून मागील दोन वर्षात ते या दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले आहेत. दक्षिण काश्मीरमधील लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांची संख्या २०, तर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांची संख्या १० ते १२ इतकी आहे.