Hindi, asked by ARTCREATIONS, 6 months ago

आप#या जीवनातील खेळाचे मह'व तुम(या श)दांत लहा.

MARathi plz give my exan going on

Answers

Answered by Anonymous
7

खेळांनी व्यायाम होतो, शरीर बळकट होते; पण खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तेथे आपल्या एकट्याचा विचार करून चालत नाही, संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो. खेळामुळे मनोरंजन होते व मनाला उत्साह मिळतो. दोन-चार तास अभ्यास केल्यावर कंटाळा येतो. त्यानंतर थोडा वेळ खेळल्यावर कंटाळा पळून जातो आणि अभ्यासासाठी पुन्हा उत्साह येतो. खेळात मनाची एकाग्रता साधता येते.

खेळांचाही अभ्यास करावा लागतो, खेळालाही सराव लागतो आणि खेळासाठीही उत्तम मार्गदर्शक गुरू असावा लागतो. खेळ म्हटला की यश आणि अपयश आलेच. कधी हार होणार, कधी जीत होणार; पण हारही हसत स्वीकारता आली पाहिजे. हरणारा खेळाडू जिंकलेल्या खेळाडूचे प्रथम अभिनंदन करतो. खेळातून येणारी ही खिलाडूवृत्ती जीवनात फार उपयोगी पडते.

प्रत्येकाला आपल्या जीवनात केव्हा ना केव्हा संकटाला तोंड दयावे लागते. कधी हार पत्करावी लागते. अशा वेळी खिलाडूवृत्ती असेल तरच आपण पुढे जातो. अपयशाने खचून जाणाऱ्याच्या हातून काहीच घडत नाही. जशी हार, तशीच जीत ! हार झाल्याने खचून जाऊ नका. तसेच, जीत झाल्याने फुगून जाऊ नका, असे सच्चा खेळाडू सांगतो. खेळातील हार संयमाने स्वीकारावी, तसाच जीवनातील विजयही विनम्रतेने स्वीकारावा.

खेळात हार-जीत असली तरी खेळ खेळले जातात ते मैत्रीसाठी! ऑलिम्पिक, विम्बल्डन, एशियाड आदी विविध खेळांच्या जागतिक स्पर्धा वर्षभर खेळल्या जातात, ते एकमेकांचे कौतुक करण्यासाठी, स्नेहाचा हात पुढे करण्यासाठी! खेळांमुळेच आपली उत्साही वृत्ती टिकून राहते.

hope it helps.....

thanks....m

Answered by shobagonal567
2

Answer:

the above answer is wrong report that answer

Similar questions