आपले पंतप्रधान essay in Marathi
Answers
नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले. गतिशील, समर्पित आणि दृढनिश्चयी नरेंद्र मोदी एक अब्जाहून अधिक भारतीयांच्या इच्छा आणि आकांक्षा प्रतिबिंबित करतात.
मे 2014 मध्ये कार्यभार स्वीकारल्यापासून पंतप्रधान मोदी यांनी सर्वंकष आणि सर्वसमावेशक विकासाच्या अशा मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. जिथे प्रत्येक भारतीय त्याच्या आशा-आकांक्षा पूर्ण होऊ शकतील. अंत्योदय अर्थात शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा पोहोचवून त्याचा विकास करण्याच्या तत्त्वाने ते सर्वाधिक प्रेरित आहेत.
अभिनव कल्पना आणि उपक्रमांच्या माध्यमातून प्रगतीची चाके जलद गतीने फिरतील आणि विकासाची फळे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचतील याची सरकारने खबरदारी घेतली आहे. सरकार आता अधिक खुले, सुलभ आणि पारदर्शक बनले आहे.
देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिक सहभागी व्हावा यासाठी प्रधानमंत्री जन धन योजना आमूलाग्र बदल घडवून आणणारी ठरली. व्यापार सुलभ बनवण्यावर भर देण्याबरोबरच त्यांच्या ‘मेक इन इंडिया’ या आवाहनामुळे गुंतवणूकदार आणि उद्योजकांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला. श्रम सुधारणा आणि ‘श्रमेव जयते’ उपक्रमाअंतर्गत श्रम प्रतिष्ठेमुळे लघु आणि मध्यम उद्योगांमधील अनेक कामगारांचे सशक्तीकरण झाले तसेच आपल्या कुशल युवकांना देखील प्रोत्साहन मिळाले.
भारत सरकारने येथील जनतेसाठी तीन सामाजिक सुरक्षा योजना सुरू केल्या आणि त्याचबरोबर ज्येष्ठांना निवृत्तीवेतन आणि गरीबांना विम्याचे कवच देण्यावर भर दिला. जुलै 2015 रोजी पंतप्रधानांनी ‘डिजिटल इंडिया’ अभियानाचा शुभारंभ केला. जनतेच्या जीवनमानात गुणात्मक बदल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा कल्पक आणि अधिकाधिक वापर करणारी ही योजना आहे.
Answer: