Science, asked by PragyaTbia, 1 year ago

आपत्ती व्यावस्थापनाचे स्वरूप वर टिपा लिहा.

Answers

Answered by NEHA7813
16

* Q. आपत्ती व्यवस्थापनाचे स्वरूप ,

उत्तर : आपत्ती टाळणे ( आपत्तीपूर्व व्यवस्थापन ) तसेच आपत्ती आल्यास आपत्तीलातोंड देणे ( आपत्ती / आघातानंतरचे व्यवस्थापन ) या दोन बाबी आपत्ती व्यवस्थापनात येतात . या संपूर्ण कामात । आपत्ती प्रतिबंधात्मक योजना , निवारण व पुनर्वसन आणि पुनर्निर्माण । अशा अंगांचा विचार केला जातो आणि त्यावर अनुसरून कृती । आराखडा तयार करतात . अशा सर्व कार्याचे सूत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन विभाग व केंद्रे करतात . आपत्कालीन नियोजन चक्राप्रमाणे पूर्वतयारी , विमोचन , सज्जता , प्रतिसाद , पुनरुत्थापन आणि पूर्ववतता अशा टप्प्यांत आपत्तीशी सामना केला जातो . आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्ती यांचा विचार करून त्याप्रमाणे त्वरित निर्णय घेऊन आपत्ती व्यवस्थापन केले जाते . | सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आणीबाणीची अवस्था ,

Answered by gadakhsanket
6
★उत्तर - आपत्ती लहान असो किंवा मोठी ,अल्पकालीन असो व दीर्घकालीन ,तिच्यावर मात करणे. गरजेचे असते.आणि त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रभावी व परिणामकारक असते.लोकांचा सहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते खूप जवळचे असते.
आपत्ती टाळणे ,आपत्तीला तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय.आपत्कालीन नियोजन चक्राप्रमाणे पूर्वतयारी , विमोचन , सज्जता, प्रतिसाद, पुनरुत्थापन आणि पुर्वतता अशा टप्प्यात आपत्तीशी सामना केला जातो.

धन्यवाद ...
Similar questions