Science, asked by PragyaTbia, 1 year ago

आपत्ती व्यावस्थापन प्रधिकारण वर टिपा लिहा.

Answers

Answered by NEHA7813
0

* ( 1 ) आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण .

उत्तर : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात शासकीय स्तरावर काम करते . राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाचे काम अशी प्राधिकरणे करतात . यांच्या दुवारे आपत्ती आल्यावर करावयाचे नियंत्रण व त्यातून येणाच्या समस्यांचे निवारण हे कार्य चालते . राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याच्या कक्षेत निरनिराळ्या राज्यांची राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे येतात . राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान , तर राज्य पातळीवर मुख्यमंत्री हे अध्यक्ष असतात . राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खालोखाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे काम करतात . | जिल्हाधिकारी हा त्या त्या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करतो . त्याच्या खालोखाल तालुका आणि गाव पातळीवरील समित्या काम करतात . तालुक्याचा तहसीलदार तर गावचा सरपंच हे त्या त्या । प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात . प्रत्येक पातळीवर सामाजिक संस्था आणि शास्त्रीय स्वरूपाचे संशोधन ( उदा . , हवामान खाते ) करणा - या । संस्था मदत करतात .

Answered by gadakhsanket
0

★उत्तर - आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरण हे आपत्ती व्यवस्थापणाच्या संदर्भात शासकीय स्तरावर कार्य करते.राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य अशी प्राधिकरणे करतात.त्यांच्या द्वारे आपत्ती आल्यावर करावयाचे नियंत्रण व त्यातून येणाऱ्या समस्यांचे निवारण हे कार्य चालते.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याच्या कक्षेत वेगवेगळ्या राज्यांची राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे येतात.राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान राज्य पातळीवर मुख्यमंत्री हे अध्यक्ष असतात.राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरनाच्या खालोखाल जिल्हा आपत्ती प्राधिकारने कामे करतात.

धन्यवाद...

Similar questions