आपत्ती व्यावस्थापनाची उद्दिष्टे कोणती?
Answers
* Q. आपत्ती व्यवस्थापनाची उदिष्टे कोणती ?
उत्तर : आपत्ती व्यवस्थापनाची उदिष्टे पुढीलप्रमाणे आहेत :
( 1 ) आपत्ती येते तेव्हा मानवावर जीवितहानीचे संकट येते . त्यातून जास्तीत जास्त लोकांची सुटका करणे . |
( 2 ) आपत्तीनंतर येणा - या अन्न व पाणी तुटवड्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची गरज भासते . या वस्तू आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने पुरवणे . त्यायोगे समाजाला वाटणारी असुरक्षितता , आपत्तीची तीव्रता व आपत्तीनंतर येणारे दु : ख दूर करणे .
( 3 ) आपत्तीग्रस्तांच्या जीवनात पुन्हा सुरळीतपणा आणणे . आपत्तीग्रस्त प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे . |
( 4 ) आपत्तीमुळे नुकसान झालेल्या लोकांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करणे .
( 5 ) भविष्यात येणा - या आपत्तींवरील संरक्षणात्मक उपाय योजून अशा आपत्तींची झळ लोकांना पोहोचणार नाही किंवा आल्यास त्याची तीव्रता कमी पोहोचेल याची काळजी घेणे .
१)आपत्ती काळात मानवी समाजावर ओढवलेली जीवित हानी दूर करणे. व त्यातून लोकांची सुटका करणे.
२)जीवनावश्यक वस्तूंची आपत्तीग्रस्ताना योग्य पद्धतीने पुरवठा करून आपत्तीची तीव्रता व आपत्तीनंतर येणारे दुःख दूर करणे.
३)आपत्तीग्रस्त मानवी जीवनात पुन्हा सुरळीतपणा निर्माण करून त्या प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे.
४)आपत्तीग्रस्तांचे पूनर्वसन योग्य पद्धतीने करणे.
५)आपत्तीवरील संरक्षणात्मक उपाय योजून भविष्यकाळात अशा आपत्तीची झळ पोहोचणार नाही किंवा आल्यास त्याची तीव्रता कमी पोहोचेल याची काळजी घेणे.
धन्यवाद...