आपत्ती व्यवस्थापन चक्र आणि मुख्य क्रियाकलापांची रचना
Answers
Answer:पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन परिस्थिती गंभीर होते. त्यापार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. यापद्धतीनुसार प्रत्येक विभागांना कामे नेमून दिलेली असतात. त्याप्रमाणे त्यांनी आपापली कामे आपत्तीपूर्व काळात, आपत्तीच्या काळात आणि आपत्ती नंतरच्या काळात करावयाची असतात. त्यामुळे सर्व विभागात समन्वय राखला जाऊन तात्काळ दिलासा मिळतो.
पावसास सुरुवात होण्याआधीच जळगाव जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करुन आपली सज्जता केली आहे. जिल्हा आपत्ती निवारण कक्षाकडे उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात 5 शासकीय बोटी व 12 खाजगी बोटी तर 43 होड्याही आहेत. पुरात पोहू शकतील अशा 893 पट्टीच्या पोहणाऱ्यांची माहिती कक्षाकडे आहे. शिवाय 746 होमगार्ड पथके उपलब्ध आहेत. या शिवाय संपूर्ण शासकीय यंत्रणा ही प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करुन आपत्तीच्या प्रसंगांसाठी सज्ज आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपत्तीच्या प्रसंगी आपदग्रस्तांना तातडीने मदत देणे व विविध आपत्ती संदर्भात प्रतिबंध, निवारण, पूर्वतयारी, प्रतिसाद, मदत व पुनर्वसन इत्यादी बाबी सुव्यवस्थितपणे हाताळण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. याप्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात तर सहअध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकीत्सक, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग हे सदस्य तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी किंवा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी काम पहावयाचे असते. या प्राधिकरणासाठी महानगरपालिका आयुक्त व जिल्हा समादेशक होमगार्डस हे विशेष निमंत्रित सदस्य असतात.
मंडळनिहाय पर्जन्यमापक यंत्र आपल्या जिल्ह्यात प्रामुख्याने पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असते. त्यासाठी पर्जन्यमानाचे सातत्याने निरीक्षणासाठी जिल्ह्यात एकूण मॅन्युअल पद्धतीचे 86 पर्जन्यमापक यंत्रे मंडळस्तरावर बसविण्यात आली आहेत. प्रमाणित कार्यपद्धतीनुसार विभागनिहाय कार्यप्रणाली प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करताना आपत्तीच्या प्रसंगी व नंतर प्रत्येक विभागाने करावयाची कामे व त्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. विभागनिहाय कार्यपद्धती याप्रमाणे-