Physics, asked by vitthalgoley9739, 1 year ago

आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छतेबाबत थोडक्यात माहिती लिहा?

Answers

Answered by gadakhsanket
77

नमस्कार मित्रा,


# परिसर स्वच्छता आणि आरोग्य-

- परिसर स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. यातले बरेचसे प्रश्न हे निकृष्ट राहणीमान असल्यामुळे निर्माण होत असतात.

- सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे सगळीकडे घाणीचे साम्राज्य निर्माण होते व अशा अस्वच्छतेमुळे डासांची निर्मिती होते. डासांमुळे होणारे आजार व त्याचा प्रादुर्भाव यावर लक्ष टाकले पाहिजे.

- परिसर स्वच्छतेमध्ये लोकांना योग्य व पुरेसा आहार, शुद्ध पाणी आपल्या मुलांना योग्य वेळी लस टोचून घेतली असती तर फारसे आजार उद्भवलेच नसते.

- जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ६०% आजार किंवा रोग सुरक्षित/ शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या व योग्य परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे होतात.

- विशेषतः कुपोषित बालकांवर अशुद्ध पाणी, प्रदूषित परिसरच प्रतिकूल परिणाम करतो.

- परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. परिसर स्वच्छता एकदाच करून भागणारी गोष्ट नाही तर सतत चालणारी प्रक्रिया आहे.


तुझे उत्तराने समाधान झाले असेल अशी अपेक्षा करतो.

Answered by omr20992
3

Answer:

arogyachya drushtine parisar svachchhatebabat uttar marathi

Similar questions