Hindi, asked by vaishnaviBari, 3 months ago

●'आरसा या घटकाचे आत्मवृत्त लिहा
मी आरसा बोलतोय●​

Answers

Answered by punam33
5

Answer:

काल परवाची गोष्ट आहे. मी आरशासमोर उभा राहून माझा मलाच निरखून पाहत होतो. तेवढ्यात मला कुठून तरी आवाज आला... म्हणून मी इकडे तिकडे पाहू लागलो. परंतु रूमात माझ्या शिवाय कोणीही नव्हते. इतक्यात पुन्हा आवाज आला अरे ऐ दादा ऐ एकडे पहा, मी आरसा बोलतोय! समोर पाहतो तर काय चक्क आरसा माझ्याशी बोलत होता. मी थोडा घाबरलो हे कसे शक्य आहे. परंतु आरसा मला समजावीत सांगू लागला. घाबरू नको, खूप दिवसांपासून मला तुझ्याशी बोलायचं होतं. आणि आज मला संधी मिळाली.अरे, जेव्हा मानव उत्क्रांतीच्या पहिल्या पायरीवर होता, तेव्हा मानवाजवळ अन्न, वस्त्र व निवारा तर होताच. परंतु मनुष्याने स्वतःचे प्रतिबिंब पहिल्यांदा पाण्यात पाहिले. तेव्हा त्याला आपले रूप लक्षात आले. यानंतर पाण्यातून काचेचा व काचेतून माझा जन्म झाला. आधीच्या काळात प्रतिमा पाहण्यासाठीचे एकमेव साधन पाणीच होते. कालांतराने माझे रूप बदलत गेले. आज माझी अनेक रूपे आहेत, अनेक प्रकारात मी उपलब्ध आहे अंतर्गोल, बहिर्गोल, सपाट, गोल मोटरीचा आरसा, घरातला लहान आरसा, महलातील मोठे आरसे ही सर्व माझीच भावंडे आहेत, फक्त आमचे आकार व रूप वेगवेगळे आहे.

Similar questions