World Languages, asked by savitajaiswar7100, 1 year ago

Aarsa nasta tar essay in marathi language

Answers

Answered by shristi989
13

hey mate....... here is your essay in Marathi language.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण aarsa nasta tar marathi nibandh बघणार आहोत. हा एक कल्‍पनात्‍मक निबंध आहेत त्‍यामुळे आरसा नसता तर काय झाले असते याचे वर्णन खालील 2 निबंधामध्‍ये तुम्‍हाला दिसुन येईल चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

आजच्या युगात माणसाला ज्या गोष्टी अनिवार्य वाटतात; त्यांपैकी एक म्हणजे 'आरसा.' घरातून बाहेर पडताना लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकजण आरशात डोकावल्याशिवाय राहत नाही. शहरांमधून ऑफिसात काम करणाऱ्या तसेच कॉलेजांत शिकणाऱ्या मुलींच्या पर्सेसमध्ये 'आरसा' आढळतोच. रस्त्यावरून जाणारा कॉलेज युवक एखादया मोटारच्या आरशात डोकावून आपले केस ठाकठीक असल्याची खातरजमा करून घेतो. सांगायचा हेतू काय की, प्रत्येकाला आपली छबी वारंवार पाहण्याची हौस असते आणि त्यामुळे आरसा ही आज आवश्यक गोष्ट झाली आहे

आरसा नसता तर माणसाची मोठी गैरसोय झाली असती. स्वत:चे रंगरूप माणूस जाणू शकला नसता आणि मग स्वत:चीच तोंडओळख त्याला पटली नसती. परीक्षेत आपणाला लाभलेल्या यशाचा आनंद आपल्याला आरसा दाखवतो. आपल्या आवडत्या माणसाची दीर्घकालानंतर झालेली आतुरतेची भेट आरसा खुलवतो आणि एखादया दुःखद प्रसंगी सगळ्यांच्या नजरा चुकवून आपल्या डोळ्यांनी गाळलेले अश्रू हाच आरसा टिपून घेतो. आरसा हा माणसाचा फार जवळचा मित्र आहे.

आरशाला संस्कृतमध्ये आदर्श' म्हणतात. रूप जसे असेल तसेच आरसा दाखवतो. तो कुरूपाला सुंदर बनवू शकत नाही. म्हणजे आरसा हा 'प्रामाणिकपणाचा आदर्श' आहे. म्हणून तर आपण आरशाची उपमा देऊन म्हणतो, त्याचे मन आरशासारखे नितळ आहे. आरसा नसता तर सुंदर माणसांना आपल्या सौंदर्याची अवास्तव जाणीव झाली नसती आणि त्यामुळे कुरूप माणसांना वाईट वाटले नसते.

केशकर्तनालये, फोटो स्टुडिओ अशा अनेक ठिकाणी आरसे मोठी कामगिरी बजावतात. आरसा नसता तर अनेक ठिकाणी सजावटीचे काम अपूर्ण राहिले असते. अनेक वैज्ञानिक प्रयोगांत आरशाला स्थान असते. आरसा नसेल तर ते प्रयोग अपूर्ण राहतील. अंतर्गोल भिंग-बहिर्गोल भिंग असलेले आरसे माणसांना हसवतात व ते मोटारींनाही उपयोगी पडतात. गावातील जत्रांत आरशांना महत्त्वाचे स्थान असते. आरसा नसेल तर ही सारी गंमत हरवून जाईल. तेव्हा असा हा बहुगुणी आरसा हवा आणि हवाच!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही थैंक तथा फौलो करून सांगु शकता . धन्‍यवाद

hope it will be helpful for you! please mark my answer as brainliest and follow me for your doubt clearing.

Answered by shindeharshwardhan77
1

Answer:

Marathi Book page 24fh gfh ygvnvggdgdfyryfgfgf

Similar questions