आशा मुंडले यांच्या निबंधातील दिसणारी स्त्री याविषयी सविस्तर विवेचन करा?
Answers
Answer:
लहान मुलाला वळण लावण्याचे काम प्राण्यांच्या जीवनात प्राण्यांचे आई-बाप करतात. परंतु माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर भाषा आणि संस्कृती निर्माण केली आहे. त्यामुळे माणसाच्या लहान मुलाला वळण लावण्याचे काम खूपच गुंतागुंतीचे झाले आहे. देश, काल, परिस्थितीनुसार त्यात खुपच विविधता दिसते.
आपण जरी फक्त महाराष्ट्रापुरता विचार केला तरी आपली मुले पुढे कशी निघावीत याबद्दल आई-बापांच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या श्रीमंत आईला वाटते, की माझा मुलगा दहावीला आहे, म्हणून त्याने वर्षभर इकडची काडी तिकडे करू नये. फक्त अभ्यास करावा आणि चांगल्या मार्कांनी पास व्हावे. कारण त्याला उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे. हे ध्येय गाठण्यासाठी या मुलाचे आई-वडील वर्षभर त्याची उत्तम सेवाचाकरी करतात. उलट एखाद्या गरीब आईला वाटेल, की आपला मुलगा कसाबसा दहावीपर्यंत आला. आता पास होऊन त्याने नोकरीला लागावे. आपल्याला तेवढीच मदत होईल. त्याहूनही कनिष्ठ परिस्थितीतल्या माणसाला वाटेल, की मुलाला पाच-सहा वर्षांचा असल्यापासूनच कुठेतरी कामाला अडकवले पाहिजे, त्याने जर शाळेचे वेड डोक्यात घेतले तर ते आपल्याला परवडणार नाही. प्रसिद्ध लेखक, डॉक्टर आनंद यादव यांच्या वडिलांना लहानपणी आनंद शाळेत जातो हे मुळीच आवडत नसे, त्याकरिता त्यांनी मुलाला मारही दिला, असा उल्लेख डॉ. यादवांच्या आत्मचरित्रात आहे.
तेव्हा आत्तापर्यंत तरी सर्व मुलांवर एकच एक 'उत्तम संस्कार अशी परिस्थिती नव्हती. आजकाल मात्र प्रत्येक गोष्टीला 'युनिफॉर्म' पद्धतीचे एकच एक उत्तर शोधण्याची प्रवृत्ती वाढत आहे. म्हणून सर्वांसाठी सरधोपट संस्कारवर्गही निघतात.
वास्तविक आधीच कुपोषित आदिवासी मुलाला त्याची झोप अपुरी ठेवून, पहाटे ४.३० वाजता उठवून गीता म्हणायला लावणे हा संस्कार नसून, क्रूरपणा आहे. हा प्रकार मी प्रत्यक्ष काही तथाकथित कल्याण' करणाऱ्या शाळांमधून स्वतः पाहिला. तेथील माझ्या भाषणांतून त्यावर टीकाही केली.
संस्कार हवेत, पण ते दुराग्रही नकोत.
शिवाय अन्न, वस्त्र, निवारा,औषधोपचार आणि शाळेत सहज प्रवेश हे मूलभूत हक्क आधी मुलांना देण्याचे काम केले पाहिजे. आपण जिवंत आहोत, सन्मानाने जगू शकतो हा उत्तम संस्कार, ही काळजी घेतली, तर नक्कीच होईल.
'पुराणातील वांगी पुराणात' या प्रमाणे संस्कारवर्गात सारख्या संस्कृतीच्या आणि - आदर्शाच्या गप्पा आणि बाहेरच्या जगात मात्र अनार्य कमी प्रतीचे किंवा विशिष्ट धर्माच्या माणसांना तुच्छ लेखावे. अशा कडवट शिकवणुकी देणारे लोक जर संस्कारवर्गाचे चालक असले तर उपायापेक्षा अपायच होईल.
विशिष्ट ध्येय किंवा मूल्य, मुलांना शिकवता येते. पण ते मूल्य स्वतःच्या जीवनात, आचरणात हवे, ज्याला स्वतःच्या देशातले परधर्मीय परके वाटतात, त्याने विश्वबंधुत्वाच्या गोष्टी करणे शोभत नाही. जो घरात जातिभेद पाळतो, तो बाहेर सामाजिक समता रुजवू शकत नाही.
- आशा मुंडले.