आत्मकथन जय जवान
मुद्दे : 1) देशाच्या सिमेचे रक्षण
2) घरापासून दुर
3) कम करण्यास स्फुर्ती
4) दहशतवदी हल्ले
5) कामाची कृतार्थता
6) स्वदेशी रक्षण
7) देशवसियांचे प्रेम
8) प्रतिकूल हवामान
Answers
Explanation:
भारतीय जवान आणि किसान यांचे महत्त्व विशद करताना लालबहादूर शास्त्री म्हणतात ''देशाचे रक्षण जवान करतील, तर देशाचे पोषण किसान करतील. जवानांच्या पराक्रमाला किसानांच्या श्रमाची जोड मिळावयास हवी. देशाच्या सीमा जवानांनी सांभाळाव्यात आणि देशातल्या जमिनी किसानांनी पिकवाव्यात. जवानांनी आमचे प्राण वाचवावेत, तर किसानांनी आम्हांला जिवंत ठेवावे. तोफा नि बंदुकांइतकेच आपल्या देशात नांगराचे महत्त्व आहे. म्हणूनच जवान आणि किसान हे खर्या अर्थाने मातृभूमीचे रक्षक आहेत.''
' लहान मूर्ती पण थोर कीर्ति' असे लालबहादूर शास्त्री यांचे वर्णन केल्यास वावगे ठऱणार नाही. शास्त्रीजींचा जन्म 2 ऑक्टोबर, 1904 रोजी मोगलसराय येथे शारदा प्रसाद या शिक्षकाच्या कुटुंबात झाला. शास्त्रीजी दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी शास्त्रीजींच्या मातोश्री रामदुलारी यांच्यावर आली. शास्त्रींना बाल वयापासूनच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, लाला लजपतराय यांच्यासारख्या महापुरुषांची भाषणे ऐकण्याचा नाद होता. बनारस येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर उच्चशिक्षणासाठी ते काशी येथील राष्ट्रीय विद्यापीठात दाखल झाले आणि तेथेच 1926 मध्ये त्यांना विद्यापीठाने 'शास्त्री' ही पदवी बहाल केली.
स्वातंत्र्य संग्रामात योगदा न
ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारतमातेची मुक्तता करण्यासाठी आपण योगदान दिले पाहिजे, या भावनेतून त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. प्रथम त्यांनी 1930 मध्ये गांधीजींच्या सविनय कायदेभंग चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. ब्रिटिश सरकारच्या जुलमी राजवटीविरूद्ध जाहीर वक्तव्य केल्याबद्दल त्यांना अडीच वर्षांची कारावासाची शिक्षा झाली. वास्तवात शास्त्रीजींच्या घरची स्थिती खूपच हलाखीची होती. शास्त्री तुरुंगात असताना त्यांची दीड वर्षाची कन्या मंजू विषमज्वराने आजारी पडली. त्यांच्या पत्नी ललितादेवी औषधोपचरासाठी पुरेसा पैसा जमा करु शकल्या नाहीत. त्यातच त्यांच्या कन्येचा मृत्यू झाला. गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून शास्त्रीजींनी 1942 च्या चलेजाव जळवळीत भाग घेऊन इंग्रजांना भारत छोडोचा सज्जड इशारा दिला. 1932 ते 1945 दरम्यान शास्त्रीजींना सात वेळा अटक होऊन त्यांनी नऊ वर्षे तुरुंगवास भोगला.
यशस्वी राजकीय कारकीर् द
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1952 मध्ये शास्त्रीजींची राज्यसभेवर निवड झाल्यावर पंडित नेहरुंनी आपल्या मंत्रिमंडळात त्यांची रेल्वेमंत्री म्हणून नेमणूक केली. रेल्वेमंत्री म्हणून कायर्रत असताना 1956 मध्ये आरियालूर येथे रेल्वेचा भीषण आपघात झाला असता त्यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन पदाचा तत्काळ राजीनामा दिला. त्यानंतर 1956 मध्ये अलाहाबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्यावर त्यांच्याकडे दळणवळण व उद्योग खाते सोपविण्यात आले. इतकेच नव्हे तर, त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर खूश होऊन पंडित नेहरुंनी आपल्या आजारपणाच्या कालावधीत शास्त्रीजींना बिनखात्याचे मंत्री म्हणून नियुक्त केले. त्याकाळात त्यांनी अप्रत्यक्षरित्या नेहरुंच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळला. नेहरुंच्या निधनानंतर शास्त्रीजींनी 27 मे, 1964 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पंतप्रधानपदाची धरा सांभाळल्यावर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ते म्हणाले, ''भारतात निरनिराळ्या प्रदेशात भिन्न भिन्न प्रकारची भाषा बोलणारे लोक राहतात. त्यांनी आपले प्रादेशिक प्रश्न बाजूला सारुन प्रथम आपण भारतीय आहोत याची जाणीव ठेवावी. 'एक देश- एक राष्ट्र' या अभेद्य चौकटीत राहूनच आपण आपले मतभेद मिटविले पाहिजेत. एकात्मतेची भावना वृद्धिंगत करुन राष्ट्रीय एकजुटीसाठी आपण सर्वजन निकराचे प्रयत्न करुया.'' शास्त्रीजींच्या जाज्वल्य देशाभिमानाचे प्रतिबिंब यातून दृष्टोत्पत्तीस येते.
सामान्यांतील असामान् य
शास्त्रीजींचा स्वभाव अत्यंत शांत, सुस्वाभवी व संयमी होता. गोरगरीबांबद्दल त्यांना खूप कणव होती. चिडणे, रागावणे, दुसर्या अवमान करणे वा राजकारणाचे कुटिल डावपेच खेळणे या गोष्टी त्यांच्या स्वभावात तीळमात्रही नव्हत्या. केंद्रीय गृहमंत्री असताना देखील अलाहाबाद या त्यांच्या गावी शास्त्रीजींचे स्वत:च्या मालकीचं घर नव्हतं, त्यामुळे शहरातले स्नेही-मित्र त्यांना घर नसलेला गृहमंत्री (होमलेस होम मिनिस्टर) असं मिश्किलपणे म्हणत असत. स्वत:साठी वा आपल्या कुटुंबियांसाठी काहीही न करता, त्यांनी देशातील गोरगरीब, दुर्लक्षित घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी आपलं सारं आयुष्य पणाला लावलं. त्यांची राहणी अत्यंत साधी होती.
Explanation:
मराठी आत्मकथा देशावरचे prem