| आत्मकथन:
कार्य
दु:ख
महत्त्व
अनुपस्थितीचे धोके
वरील घटक त्मच्याशी बोलत आहेत अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.
Answers
Answer :-
मी सूर्य बोलतोय....
भर दुपारी डोक्याला गमचा किंवा टोपी घालून परीक्षेला जाणारी पोरं मी नेहमीच पाहतो. कुणी रस्त्यातच कुल्फी खातं तर कुणी बर्फ गोळा चोखत बसतं. पण माझ्या या तीव्र उन्हाने प्रत्येकालाच त्रास होतो. त्याबद्दल मी आताच दिलगीर व्यक्त करतो. अहो, काय झालं? मी तर आग ओकणारा गोळा सूर्य बोलत आहे.
मी काय करतो? मी फक्त आग ओकून तुम्हांला त्रासच देतो असं नाही तर मी बरीच तुमच्या भल्याची कामे पण करतो. मी सर्व झाडांना त्यांच्या अन्ननिर्मिती साठी माझा प्रकाश देतो. तसंच थंडीत कुडकुडणाऱ्यांना ऊब देतो. मी बऱ्याच कारखान्यांचं वीजबिल ही वाचवतो. म्हणजे मी सौरऊर्जा निर्माण करण्यासाठी मदत करतो. आजून किती काम सांगू मी माझं!
माझं तुमच्या सगळ्यांच्या जीवनात खूप महत्त्व आहे. मी तुमच्यासाठी खूप काही करतो. अगदी ऊब देण्यापासून ते ऊर्जा निर्माण करे पर्यंत! मला हे काम करावंच लागतं. कारण माहितेय? फक्त आणि फक्त तुमच्या भल्यासाठीच मी दररोज न चुकता लाखो अंतर पार करून उगवतो आणि पुन्हा मावळतो! आजून काय करू मी!
कधी कधी वाटतं की जर मी नसतो तर काय झालं असतं या पृथ्वीचं. सगळीकडे अंधार पसरला असता. सारं जग बुडालं असतं. कोणालाच विजेचा शोध लागेपर्यंत काहीच दिसलं नसतं. अहो, मला सांगितलंय माझ्या लहान भावानं, तुमच्या चांदो मामानं! नाईट शिफ्ट असणाऱ्यांची जरा लाईट गेली, की कशी तारांबळ उडते ते. मी माझं कौतुक करत नाहीये. पण तुम्हांला सावधानतेचा इशारा नक्कीच देतोय!
मी एवढं सगळं करतो तुमच्यासाठी. खरं तर खूप थकून जातो मी! पण मला आनंद आहे, की मी तुमच्या उपयोगी येतो. पण तरीही उराशी एक दु : ख बाळगून असतो मी. दु : ख याचंच की माणूस एवढा स्वार्थी आहे, की तो त्याच्यासाठी आवश्यक गोष्टीलाही संपवायला मागे - पुढे पाहत नाही. किती कत्तल करता तुम्ही झाडांची! तुम्हांला धक्का बसला असेल हे ऐकून ; पण आमची देखील एक साखळीच आहे. त्यातला एक जरी तुकडा बाजूला झाला तर अख्खी साखळीच तुटून पडू शकते.
असो! खूप वेळ झाला तुमच्याशी बोलून. मी तुमच्यावर दु : खी नक्कीच आहे ; पण मी माझं काम मात्र सोडणार नाही. पुन्हा कधीतरी बोलू जर तुम्ही मला जिवंत ठेवलं तर! तोपर्यंत राम - राम!
तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.