आत्मकथनपुढील मुद्द्यांच्या आधारे सीमेवरील जवानाचे मनोगत लिहा.*पासून दूर* दहशतवादी हल्ले* प्रतिकूल हवामान* देशवासीयांचे प्रेम* कामाची कृतार्थता* काम करण्यास स्फूर्ती* देशाच्या सीमेचे रक्षण* विदयार्थ्यांना संदेश
Answers
Answer:
नैसर्गिक संकट असो किंवा मानवनिर्मित संकट, सीमेवरती हल्ला असो किंवा अंतर्गत कलह आपल्याला एकच गोष्ट आठवते आणि ती म्हणजे भारतीय सैनिक.
मी भारतीय सैनिक बोलतोय. सैनिक असलो तरी मी एक माणूस आहे. देशाच्या रक्षणासाठी आम्हाला नेहमी सीमेवरती राहावे लागते. कुटुंबापासून तसेच नातेवाईकांपासून दूर लागते. सिमेवर लढत असताना कधी दहशतवादी हल्ला होईल हे सांगता येत नाही. सीमेवरती नेहमी प्रतिकूल परिस्थितीत निसर्गाशी तसेच शत्रूशी लढावे लागते. परंतु सैनिक म्हणून देशाचा आमची पहिली पसंत असते. देशातील लोक आमच्यावर प्रेम करतात ते बघून खूप बरे वाटते.
लोकांचा आमच्याबद्दल असलेला आदर बघून छाती अभिमानाने फुलून जाते. देशाबद्दल चे प्रेम आणि लोकांबद्दल आत्मीयता यामुळे शत्रूशी लढताना नेहमी प्रोत्साहन मिळते. काम करण्यास स्फूर्ती मिळते. देशासाठी काहीतरी करतोय याचा नेहमी अभिमान वाटतो व मनाला समाधान मिळते.
विद्यार्थ्यांना फक्त एवढेच सांगू इच्छितो की देश हा आपली पहिली पसंती असली पाहिजे. कारण देश राहील तर आपण राहू. म्हणून एकमेकांशी न भांडता एकत्र येऊन येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपण तोंड दिले पाहिजे.
जय हिंद!