Social Sciences, asked by santoshiy943, 11 months ago

आतरराष्टी्य दहशतवादी हल्लयाची उदाहरणे लिहा​

Answers

Answered by tejaschopade
38

Explanation:

  1. २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.[१][२][३] मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट झाला.[६]

पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब, हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यांमागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता.[७] भारतीय सरकारने कसाबचा कबुलीजबाब व त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठोस पुरावे गोळा केले, व ते अमेरिका व अन्य देशांना दिले. पाकिस्तानने आधी या प्रकरणी आपले हात झटकले, व कसाब व अन्य दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचा इंकार केला.[८] परंतु ७ जानेवारी २००९ रोजी पाकिस्तान सरकारने कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे अधिकृतरीत्या मान्य केले.[९]

या हल्ल्यांमध्ये कमीतकमी १९७ व्यक्ती ठार झाल्या

इंडोनेशिया, फ्रान्स आणि अफगाणिस्तान दहशतवादी हल्ल्यांनी हादरले आहेत. इंडोनेशियाच्या जावा प्रांतातील सुरबाया येथे रविवारी दहशतवाद्यांनी तीन चर्चेसवर हल्ले केले असून यात 9 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले आहेत. तर फ्रान्समध्ये शनिवारी रात्री एका दहशतवाद्याने नागरिकांवर चाकूने हल्ले केले, यात एकाला जीव गमवावा लागला तर 4 जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानात रविवारी दोन ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 6 पोलिसांसमवेत एकूण 12 जण मारले गेले आहेत.

इंडोनेशियात ख्रिश्चनधर्मीय लक्ष्य

इंडोनेशियात तिन्ही हल्ले स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेसातच्या सुमारास झाले. यादरम्यान ख्रिश्चनधर्मीय रविवारच्या सामूहिक प्रार्थनेसाठी एकत्र आले होते. पहिला हल्ला सुरबायाच्या सांता मारिया चर्चवर झाला, येथील बॉम्बस्फोटात 4 जणांचा मृत्यू झाला. यानंतर जीकेआय डिपोनेगोरे चर्चमध्ये झालेल्या स्फोटात दोन जणांना जीव गमवावा लागला. सुरबायाच्या सेंट्र पेंटाकोस्टल चर्चमध्ये झालेल्या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या तिन्ही हल्ल्यांमध्ये एकूण 38 जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी रोखला चौथा हल्ला

सांता मारियावरील हल्ल्याम दोन पोलीस जखमी झाले. चौथा हल्ला कॅथेड्रल चर्चवर होणार होता, परंतु संशयिताला वेळीच अटक करण्यात आल्याने तो रोखण्यात आल्याची माहिती सुरबायाचे उपमहापौर विष्णू शक्ती बुआना यांनी दिली. इंडोनेशियात काही दिवसांपूर्वीच दंगली झाल्या होत्या. या हिंसाचारात 5 जणांना जीव गमवावा लागला होता. इंडोनेशिया 2002 पासून दहशतवादाला तोंड देत आहे.

असून अल-कायदाशी संबंधित संघटनेने अनेक हल्ले घडवून आणले आहेत.

अफगाणिस्तानात दोन हल्ले, 12 ठार

अफगाणिस्तानात रविवारी दोन शहरांमध्ये झालेल्या दहशतवादी घटनांमध्ये 6 पोलीस कर्मचाऱयांसमवेत 12 जण मारले गेले. पहिला हल्ला दश्त ए बर्ची येथे झाला, येथे काही दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या मुख्यालयावर हल्ला चढविल्याने 6 पोलीस मारले गेले. तर प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत सैनिकांनी 10 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर दुसरा हल्ला जलालाबाद येथील एका शासकीय कार्यालयावर झाला असून यात 6 नागरिक मारले गेले आहेत.

तर 20 हून अधिक जण जखमी झाले. जलालाबाद येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू असल्याचे सांगण्यात आले. तर या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही.

फ्रान्सवर दहशतवादाचे सावट

फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे शनिवारी रात्री एका दहशतवाद्याने काही जणांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. दहशतवाद्याने हल्ल्यावेळी ‘अल्ला-हू-अकबर’ अशा घोषणा दिल्या होत्या. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी घटनेवर संताप व्यक्त करत ट्विट केला. फ्रान्सने पुन्हा एकदा रक्ताने मूल्य चुकविले आहे, परंतु शत्रूंना आमच्या स्वातंत्र्यावर वार करू देणार नसल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले.

या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली.

Hope it help you ☺☺❤❤

please Mark as brainlist

Similar questions