आदिवासी म्हणजे काय????????????
Answers
Explanation:
Indigenous peoples, also referred to as first people, aboriginal people, native people, or autochthonous people, are culturally distinct ethnic groups who are native to a place which has been colonised and settled by another ethnic group.
नागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिलेले संबंधित प्रदेशातील मुळचे रहिवासी म्हणजे आदिवासी, असे सामान्यपणे म्हणता येईल. सर्वसाधारणपणे जंगलात, दुर्गम दऱ्याखोऱ्यांत व सुसंस्कृत समाजापासून तुटक असलेल्या प्रदेशात ते तुरळक वस्ती करून राहतात. नागर संस्कृतीचा त्याप्रमाणे वर्गश्रेणीबद्ध समाजाचा संपर्क न झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण चालीरीती किंवा ‘संस्कृती’ आदिवासींत आढळतात. अर्थात जगातील सर्व आदिवासी त्या त्या प्रदेशातील मूळ रहिवासी आहेतच, असे ठामपणे म्हणता येत नाही. परंतु दुसऱ्या सर्वमान्य संज्ञेच्या अभावी आदिम संस्कृतीची दर्शक अशी आदिवासी हीच संज्ञा रूढ झाली आहे. अनेक नागर संस्कृतींचे उदयास्त झाले, परंतु त्यांच्याशी संपर्क न साधल्यामुळे किंवा न आल्यामुळे आदिवासी जमाती जशाच्या तशाच राहिल्या. त्यांच्यात हजारो वर्षे विशेष परिवर्तन झाले नाही.दक्षिण पॅसिफिक महासागरातील न्यू आयलँड बेटावरील मेलानीशियन आदिवासीचे कोरीव गणचिन्ह.