अभ्यासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या धाकट्या भावास पत्र लिहा
Answers
"धाकट्या भावास पत्र"
Explanation:
२०४,तुलसीविहार बिल्डिंग,
आर.जी.टी कॉलोनी,
चिंतामणीनगर.
नाशिक-४२२ ११०.
दि: ९ में,२०२१.
प्रिय नीतिन,
अनेक आशीर्वाद.
कसा आहेस नीतिन? मला निता ताईने काल पत्र पाठवले होते. पत्र वाचून फार दुख झाले. पत्रातून कळले की तू अभ्यासाकडे दुर्लक्ष करत आहेस.
नीतिन, तुझे हे असे वागणे चांगले नाही. अभ्यास न करता सतत मोबाईलवर वेळ घालवल्याने काहीच प्राप्त होणार नाही. आता तू दहावीत आहेस. यावर्षी जर तू नीट अभ्यास केले नाही, तर तुला चांगल्या कॉलेजमध्ये एडमिशन कसे मिळणार?
मी असे म्हणत नाही की तू सतत अभ्यास केले पाहिजे. थोडावेळ मित्रांसोबत खेळतसुद्धा जा, जेणेकरून तुला कंटाळा येणार नाही. अभ्यासाकडे नीट लक्ष दे आणि परीक्षेत चांगले गुण मिळव. तू परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर आम्हाला खूप आनंद होईल.
आईबाबांना माझे नमस्कार सांग.
तुझा दादा,
पुनीत