Adivasi Information in Marathi : Adivasi Vikas Yojana & Samaj History
Answers
देश प्रगतीच्या वाटेवर वळत चालले आहे, शहरांमध्ये बिल्डिंग, गाड्या, शिक्षण ह्या सारखे पैलू वेगाने वाढत आहेत व देशाचा विकास घडवत आहेत.
अश्या वेळी आपण आदिवासी (म्हणजेच छोट्या गावात, जंगलात राहणारी लोक) ह्यांचा देखील विचार केला पाहिजे.
त्यांना मदत करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या "आदिवासी विकास योजना" कार्यरत केल्या आहेत.
आदिवासीसाठी राहायला घर सरकार पुरवते तसेच अन्न, वस्त्र हे देखील ह्यात पुरवले जाते.
मुलांसाठी शालेय शिक्षण आता गरजेचे केले आहे. मुलांच्या जेवणाची सोय देखील शाळेत केली जाते.
तसेच डॉक्टर सेवा, हॉस्पिटल, विमा आणि बरेच पैलू ह्या योजने मध्ये शामिल केलेले असतात. ह्या सगळ्या कारणांमुळे आदिवासी लोक सुद्धा विकासासाठी मदत करतात. ह्या सगळ्या योजना आदिवासी लोकांसाठी खूप महत्त्वाच्या ठरत आहेत. तरुणांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कामे, नोकऱ्या पुरवल्या जात आहेत जेणे करून तरुण/तरुणी आपले शिक्षण वाया न घालवता काही तरी कमवेल व आपल्या परिवाराला जेवण पुरवेल. अश्या ह्या योजना आदिवासी विकासाची पायरी ठरत आहेत व सरकारने जास्तीत जास्त मदत त्यांना केली पाहिजे.