Hindi, asked by bodakevedikasachin, 1 month ago

अहमदनगर येथील तरूणांची पूरग्रस्तांना मदत बातमी तयार करा​

Answers

Answered by ajitdhanshri1234
0

Answer:

अहमदनगर येथील तरूणांची पूरग्रस्तांना मदत

Explanation:

म. टा. प्रतिनिधी, अहमदनगर

दिनांक - ९ ऑक्टोबर २०२१

 

अहमदनगर मध्ये आलेल्या महापुरामुळे तेथील बांधवांवर मोठे संकट आले. एका दिवसात होत्याचे नव्हते झाले.अशा परिस्थितीत या बांधवांसाठी सर्वत्र मदतीचा ओघ सुरू झाला. अहमदनगर मधील अनेक संस्था, संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. विविध सामाजिक संस्थांकडून रविवारी मदतनिधी, साहित्य जमा करण्याचे आवाहन करण्यात आले त्याला शहरवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. मुख्य भूमिका तरुणांची होती . पूरग्रस्तांसाठी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आपला दोन दिवसांचा नाश्ता सोडला. दोन दिवसांच्या नाश्ताचे पैसे जमवून या विद्यार्थ्यांनी सर्वासोंबत आपलाही मदतीचा हातभार लावला आहे. शासकीय एक हजार मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळणारा नाश्ता न करता त्याचा निधी पूरग्रस्तांना मदत म्हणून दिला. विद्यार्थ्यांनी दोन दिवसीय नाश्ता बंद करून त्यासाठी मिळालेला पैसा मदत म्हणून पाठवून दिला. यामध्ये त्यांनी साहित्य घेत पाठवून दिला.

मदत निधीसह, कपडे, पांघरणे, बेडसीट, चादर यासह किराणामध्ये गव्हाचे पीठ, टूथपेस्ट अशा साहित्याचा समावेश आहे. चौका गावकरी, परिसस्पर्श फाउंडेशन, शिवराजे ग्रुपतर्फे मदतीची हाक दिली असता चौका गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी पूरग्रस्त लोकांना पाणी बॉटल, गहू, तांदूळ, बिस्किट, औषधी साहित्य जमा केले.

Similar questions