ऐतिहासिक वास्तु चा अभ्यास अतुल आपले ला कोणती माहिती मिळतॆ
Answers
Answer:
वास्तुशास्त्र" म्हणजे नेमके काय हेच नेमके लोकांना माहित नसल्याने हे काहीतरी फार प्राचीन आणि फार मौल्यवान शास्त्र आहे असा समज वाढला आहे. आपल्या संस्कृतीतून मिळालेली हि एक मौल्यवान देणगी आहे, ह्या भाबड्या समजुतीमुळे या शास्त्राचा महिमा वाढला आहे.
खरं म्हणजे "स्थापत्य अभियांत्रिकी" म्हणजेच वास्तुशास्त्र..!! पण हल्ली ज्याचा वास्तुशास्त्र म्हणून उल्लेख आणि उदो उदो होतो, ते केवळ थोतांड वास्तुज्योतिषशास्त्र आहे...
एका वास्तुशास्त्र ज्योतिषाला कुणीतरी विचारले --
"पेशावाईची भरभराट का झाली?"
"शनिवार वाड्याचे तोंड उत्तरेकडे होते म्हणून!"
"मग पेशवाई का बुडाली?"
"वाड्यात प्रवेश करताना तोंड दक्षिणेला असत होते म्हणून!"
वास्तुशास्त्रातले "शास्त्र" काय आहे हे स्पष्ट करणारा हा संवाद आहे. विनोदाचा भाग जाऊ द्या, पण गेल्या ३०-४० वर्षात वास्तुशास्त्राचे थोतांड इतके माजले आहे की अनेकजण त्याचा गंभीरपणे विचार करायला लागले आहेत. भरमसाठ पैसे आकारून, लोकांच्या भावनांशी खेळून, घरामध्ये वाट्टेल तसे बदल करायला लावून या सर्व भंपकपाणाला शास्त्राचा आणि विज्ञानाचा मुखवटा चढवण्यात हे लोक यशस्वी झाले आहेत.