alhankar full knowledge
Answers
Answered by
3
अलंकार म्हणजे दागिने, आभूषणे होय. अलंकार घातल्याने / वापरल्याने जसे आपल्या देहाचे सौंदर्य वाढते अगदी त्याचप्रमाणे मराठी भाषेचेही सौंदर्य वाढवण्यासाठी मराठी भाषेत अलंकार आहेत. खासकरून कवी लोकं ही अलंकार आपल्या गद्यात वापरून भाषेचे सौंदर्य वाढवतात.
अलंकाराचे प्रमुख २ प्रकार पडतात :
१)शब्दालंकार २)अर्थालंकार
शब्दालंकार : शब्दांच्या किंवा अक्षरांच्या विशिष्ट रचनेमुळे शब्दांचा अर्थ बदलून चत्मकृती किंवा त्या शब्दात नाद तयार होतो तेव्हा ‘शब्दालंकार’ तयार होतो.
शब्दालंकारचे परत ३ प्रकार पडतात:
१)अनुप्रास – एखाद्या वाक्यात वा काव्यपंक्तीत एकाच शब्दाची पुरावृत्ती होऊन नाद तयार होतो तेव्हा त्यास अनुप्रास शब्दालंकार असे म्हणतात.
उदा. हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला.(रा या अक्षराची पुनरावृत्ती)
२)यमक – पद्याच्या शेवटी एकच अक्षर/शब्द पुन्हा पुन्हा आल्यास यमक अलंकार होतो.
उदा. सरणार कधी रण प्रभू तरी
हे कुठवर साहू घाव शिरी
३)श्लेष – एकाच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा श्लेष अलंकार होतो.
उदा. कुस्करु नका ही सुमने जरी वास नसे तरी तुम्हास अर्पिली सु-मने
(सुमने- फुले, सु-मने- चांगली मने)
अर्थालंकार- दोन भिन्न असलेल्या वस्तुत साम्य आणून चत्मकृतीपूर्णरित्या एकत्र बांधणे म्हणजे अर्थालंकार होय. यात साधारणपणे उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपन्हुती, अन्योक्ती, पर्यायोक्ती, विरोधाभास, व्यतिरेक, अतिशयोक्ती, अनन्वय, भ्रान्तिमान, ससंदेह, दृष्टान्त, अर्थान्तरन्यास, स्वभावोक्ती, अनुप्रास, चेतनगुणोक्ती, श्लेष, असंगती, सार, व्याजस्तुती, व्याजोक्ती असे २२ उपप्रकार पडतात.
उपमेय-ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, ते उपमेय होय. ‘गाल गुलाबासारखे मऊ आहेत.’ या वाक्यात कवी गालाचे वर्णन करत आहे म्हणून गाल हे उपमेय.
उपमान- उपमेयाचे साम्य ज्या गोष्टीशी आहे, ते उपमान होय. वरील वाक्यात गुलाब हे उपमान आहे.
साधर्म्य- उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला ‘साधर्म्य’ म्हणतात. ‘मऊ’ हे साधर्म्य आहे.
साधर्म्यसूचक शब्द-उपमेय आणि उपमान मधील साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला ‘साधर्म्यसूचक शब्द’ म्हणतात. ‘गुलाबासारखे’ या शब्दातील ‘सारखे’ हा शब्द साधर्म्यसूचक शब्द आहे.
काही प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे:-
१)उपमा- उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते तेथे उपमा अलंकार होतो. (या अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.)
उदा. मोरासारखा छाती काढून उभा रहा Iजाळासारखा नजरेत नजर बांधून पहा II
२)उत्प्रेक्षा- उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन जेथे असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. (या अलंकारात जणू, गमे, वाटे, भासे, की असलाच एखादा शब्द वापरून दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखवला असतो.)
उदा. तिचे रूप साजिरे गोजिरवाणे I चंद्रालाही वाटे लाज जणू II
३)व्यतिरेक- उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तेथे व्यतिरेक अलंकार होतो.
उदा. ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’(येथे उपमेय[देव] हे उपमानापेक्षा[अमृत] श्रेष्ठ[गोड] दाखवले आहे.)
४)रूपक – उपमेय आणि उपमान यात एकरूपता आहे असे वर्णन तेथे रूपक अलंकार असतो.
उदा.उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुखचंद्रमा सकळींकासी
५)अपन्हुती – उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे जेव्हा ठासून सांगितले जाते तेव्हा अपन्हुती अलंकार होतो.
उदा.न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातील| न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ||
६)दृष्टांत – एखादा विषय पटवून दाखल देणे.
उदा. लहाणपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा
७)चेतनगुणोक्ती – जेव्हा एखादी अचेतन वस्तू(निर्जीव) सचेतन(सजीव) आहे असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे वागते असे दाखवले असते तेव्हा चेतनगुणोक्ती अलंकार घडतो.
उदा. चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना

Similar questions