अण्णाभाऊ साठे यांच्यावर निबंध लिहा
Answers
കെഫ്ഗ്ഗ്സ്ഫ്ഘ്ഹ് ഡഫ്ഹ്ജ്ക്സ്ഫഗുജ്ഹവസിസിഫ്ഗ്ഗ് റിഫ്സ്സ്ഫ്ഗ്ഗ്ഗ്ഹുജവക്ക്ഗ്ജ്ജവക്
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख पाहुणे तसेच उपस्थितांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज मी साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या लहान गावात झाला. फक्त दिड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे हे लहानपणापासूनच हुशार होते. त्यांच्या जवळपास ३० कथासंग्रह व ३०० पेक्षा अधिक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत . 'फकीरा', 'वारणेचा वाघ', 'वैजयंता ', 'माकडाची माळ' या गाजलेल्या कादंबऱ्या. पुढे काही चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या कादंबऱ्यांवर चित्रपटही काढलेत. ते एक उत्तम साहित्यिक, समाजसुधारक, कवी आणि लेखक होते. तसेच कथा, नाट्य, लोकवाङ्मय, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, प्रवासवर्णन इत्यादीमुळे त्यांचे साहित्य जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांचे साहित्य फक्त मराठी भाषेपुरतेच मर्यादित नव्हते तर इतर भारतीय भाषेत तसेच परकीय भाषेत जर्मन, इंग्रजी, रशियन इत्यादी भाषेत भाषांतरित करण्यात आले होते. अश्या या थोरे नेत्याला १८ जुलै १९६९ रोजी जगाचा निरोप घ्यावा लागला. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते. "जय हिंद जय भारत !"