any short story in marathi
Answers
Answered by
0
सदाचारी व्यक्तीजवळ लक्ष्मी, दान यांचा वास असतो !
महाभारतकालीन राजा सत्यदेव एक दिवस सकाळी उठले, तर त्यांना एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडतांना दिसली. राजाने आश्चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्यावर त्या स्त्रीने सांगितले, ‘मी लक्ष्मी आहे, आता या राजवाड्यातून मी जात आहे.’ तेव्हा राजाने तिला सांगितले, ‘तू जाऊ शकतेस.’ लक्ष्मी बाहेर पडली. नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एका सुंदर पुरुषाला राजवाड्याबाहेर पडतांना पाहून राजाने त्यालाही विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्याने उत्तर दिले, ‘माझे नाव ‘दान’ आहे. लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाही; म्हणून मीही तिच्यासह जात आहे.’ राजाने सांगितले ‘आपणसुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता.’ त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष ‘यश’ निघून गेला. त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला अन् बाहेर पडू लागला. तेव्हा राजाने त्यालाही हात जोडून नम्रपणे त्याचे नाव विचारले. तो पुरुष म्हणाला, माझे नाव ‘सदाचार ! राजाने त्याला म्हटले, ‘मी तर तुझा कधीच त्याग केला नाही. तू मला सोडून का जात आहेस ? तुझ्यासाठीच मी लक्ष्मी, दान आदींचा त्याग केला आहे. मी तुला जाऊ देणार नाही. तू मला सोडून गेलास, तर माझे सर्वस्व जाईल !’
राजाचे हे बोल ऐकून सदाचार राजवाड्यातच थांबला. सदाचार बाहेर पडला नाही, हे पाहून बाहेर गेलेली लक्ष्मी, दान आणि यशही परत आले.
तात्पर्य :मुलांनो, सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे सर्वस्व आहे. जीवनात सदाचार (नीतीमत्ता, धर्माचरण आदी) नसेल, तर दान, लक्ष्मी (श्रीमंती) आदींचा काहीच उपयोग नाही
Hope it helps.

10
दोन संन्यासी, म्हणजे गुरु-शिष्य ८ मासांनी (महिन्यांनी) पावसाळ्यात परत त्यांच्या झोपड्यांकडे आले. आल्यावर त्यांनी बघितले की, झोपड्यांचे अर्धे छप्पर उडून गेले आहे. शिष्य म्हणाला, ‘‘बघा, आपण भगवंताची आठवण करून करून मरतो, त्याचे फळ ! म्हणून मी सांगतो, प्रार्थना, पूजा इत्यादींत काही अर्थ नाही. दुष्टांचे बंगले चांगले राहिले आणि आपल्या झोपड्या पडल्या.’’
ज्या वेळी तो हे रागाने सांगत होता, त्या वेळी गुरु आनंदाने परमात्म्याला सांगत होते, ‘परमात्म्या, तुझी कृपा म्हणून अर्धे छप्पर अजूनही आहे.’ शिष्य चिंतेत होता; म्हणून त्याला रात्रभर झोप लागली नाही. गुरु पहाटे उठले, त्या वेळी अर्ध्या छपरातून चंद्र दिसत होता. त्यांनी कविता लिहिली. त्या कवितेत होते, ‘देवा, आम्हाला आधीच ज्ञात असते, तर आम्ही आधी अर्धेच छप्पर बांधले असते. आता आम्ही झोपतांना चंद्रही बघू शकतो !’

Similar questions
Social Sciences,
8 months ago
Social Sciences,
8 months ago
Math,
8 months ago
Physics,
1 year ago
Science,
1 year ago
Geography,
1 year ago