अर्थशास्त्राची शाखा, जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे.
अ. सूक्ष्म अर्थशास्त्र ब. स्थूल अर्थशास्त्र
क. अर्थमिती ड. यांपैकी काहीही नाही
Answers
Explanation:
प्रश्न.१. योग्य पर्याय निवडा :
१) अर्थशास्त्राची शाखा, जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे.
अ. सूक्ष्म अर्थशास्त्र ब. स्थूल अर्थशास्त्र
क. अर्थमिती ड. यांपैकी काहीही नाही
पर्याय : १) अ, ब, क २) अ, ब
३) फक्त अ ४) वरीलपैकी नाही
२) सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना
अ. राष्ट्रीय उत्पन्न ब. सामान्य किंमत पातळी
क. घटक किंमत ड. उत्पादन किंमत
पर्याय : १) ब, क २) ब, क, ड
३) अ, ब, क ४) क, ड
३) सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत.
अ. राशी पद्धत ब. समग्र पद्धत
क. विभाजन पद्धत ड. सर्वसमावेशक पद्धत
पर्याय :१) अ, क, ड २) ब, क, ड
३) फक्त क ४) फक्त अ
४) स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते.
अ. संपूर्ण अर्थव्यवस्था ब. आर्थिक विकास
क. एकूण पुरवठा ड. उत्पादन किंमत
पर्याय : १) अ, ब, क २) ब, क, ड
३) फक्त ड ४) अ, ब, क, ड
उत्तरेः- १) (३) फक्त अ , २) (४) क, ड , ३) (३) फक्त क ४) (१) अ, ब, क
प्रश्न.२. सहसंबंध पूर्ण करा :
१) सूक्ष्म अर्थशास्त्र : विभाजन पद्धत :: स्थूलअर्थशास्त्र :*********
२) सूक्ष्म अर्थशास्त्र : झाड :: स्थूल अर्थशास्त्र :********
३) स्थूल अर्थशास्त्र : उत्पन्न आणि रोजगार सिद्धान्त :: सूक्ष्मअर्थशास्त्र :*******
४) मॅक्रोस : स्थूल अर्थशास्त्र :: मायक्रोस :******
५) सर्वसाधारण समतोल : स्थूल अर्थशास्त्र :: ******** :सूक्ष्म अर्थशास्त्र
उत्तरेः- १) सर्वसमावेशक पद्धत , २) वन/जंगल , ३) किंमत सिद्धांत ४) सूक्ष्म अर्थशास्त्र , ५) अंशिक समतोल
प्रश्न.३. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा:
१) गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहीती गोळा केली.
उत्तरः-संकल्पनाः- वैयक्तिक घटक/वैयक्तिक घटकांचा अभ्यास
स्पष्टीकरणः- (१) सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ठ उद्योग संस्था, कुटूंब संस्था, वैयक्तिक किंमती यांसारख्या लहान वैयक्तिकी आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. (२) वरील उदाहरणातही गौरीने एका विशिष्ठ उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नची माहिती गोळा केली असल्याने हा वैयक्तिक घटकांचा अभ्यास आहे.
२) रमेशने उत्पादनविषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरविले, उदा., काय आणि कसे उत्पादन करावे?
उत्तरः- संकल्पनाः- मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्था
स्पष्टीकरणः- (१) मुक्त बाजार अर्थव्यवस्था अशी असते की, ज्यात वस्तूच्या उत्पादना -बाबत कोणते , कसे , किती उत्पादन करावे यांसारख्ये आर्थिक निर्णयखाजगी पातळीवर घेतले जातात. (२) वरील उदाहरणातही रमेशने उत्पादन विषयक काय कसे किती हे सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवल्याने त्यातुन मुक्त अर्थव्यवस्था ही संकल्पना स्पष्ट होते.
३) शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले.
उत्तरः- संकल्पनाः- उत्पादन घटकांचे मोबदले
स्पष्टीकरणः- (१) उत्पादनात सहभाग घेतल्या बद्दल उत्पादन घटकांना खंड, वेतन व्याज व नफा हि दिली जाणारी किमत म्हणजे उत्पादन घटकांचे मोबदले होय. (२) वरील उदाहरणातही शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील भांडवलाचे व्याज दिले आहे. हे उत्पादन घटकांना दिलेले मोबदले आहेत. हे स्पष्ट होते.
Answer:
अर्थशास्त्राची शाखा, जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे.