asa asava maharast maza marathi
Answers
असा असावा महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. अनेक जाती धर्मांचे लोक महाराष्ट्र एकोप्याने नांदतात. महाराष्ट्र कसा असावा असा विचार करताच छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा समोर येतो.
ज्या महाराष्ट्राची कल्पना शिवाजी महाराजांनी केलेली, तसा असावा महाराष्ट्र. आपल्य राज्यात नेहमी समृद्धी असावी. भेद भाव नाहीसा व्हावा. घराघरांत लक्ष्मीचा वास असावा, आनंद असावा.
महाराष्ट्राची युवा पिढी महाराजांचा आदर्शांवर चालावी. येथे कोणत्याही शेतकऱ्याला आत्महत्या करायची करंज पडू नये. आर्थिक परिस्थिती मुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये. प्रत्येक कार्यात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान असावे.
असा असावा महाराष्ट्र कि आपण पुन्हा अभिमाने बोलू शकू कि, ' दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा'.
महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज ह्यांच्या विचाराने महाराष्ट्र संपन्न झाला आहे. शिवाजी महाराज, टिळक, वसंतराव चव्हाण ह्यांचा इतिहास लाभलेला आहे. साहित्य, कला, क्रीडा, क्षेत्रात राज्याने आघाडी घेतली आहे.
मुंबईतून अख्यादेशाला आर्थिक बळ मिळत. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राच्या शैक्षणिक, औद्यगिक वाटा वाढल्या आहेत. येथे हरित क्रांती घडली आहे. प्रेक्षणीय स्थळं, विद्वत्ता, ज्ञान ही महाराष्ट्राची आभूषण आहेत. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ही महाराष्ट्राची ओळख आहे. असा असावा महाराष्ट्र माझा!!