अशा असंख्य ज्योतींची तुझ्यामागून राखण दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण . या ओळीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा
Answers
Answer:
दिलेल्या काव्यपंक्ती ह्या कवयित्री इंदिरा संत यांच्या 'औक्षण' या कवितेतील आहेत. आपल्या देशाला वाचवण्यासाठी व देशाची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी सीमेवरती जवान नेहमीच सज्ज असतात . रात्रंदिवस स्वतःच्या जिवाचा विचार न करता सीमेवरती जवान अहोरात्र देशाची सेवा करतात हा आशय कवियत्री इंदिरा संत यांनी आपल्या कवितेतून मांडलेला आहे.
जेव्हा तो शूर पराक्रमी सैनिक सीमेवरती शत्रूशी लढाई करण्यासाठी जातो त्यावेळेस देशातील प्रत्येकाचे डोळे हे ते शूर योद्धा चे पराक्रम बघण्यासाठी आतुर झालेले असतात.
शूर, पराक्रमी योद्धा सीमेवर लढाईसाठी जाण्यासाठी तयार आहे आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी हा जवान मोठ्या धैर्याने सज्ज आहे.
मातृभूमी तील प्रत्येक व्यक्तीने आपल्या डोळ्यातील ज्योतींनी जवानाचे 'औक्षण 'करून देवाकडे त्याच्या रक्षणासाठी प्रार्थना केली आहे. देशवासीयांचे असे अनोखे औक्षण सैनिकाला धीर देणारे आहे 'राखण' आणि 'औक्षण' असे शब्द कवयित्री इंदिरा संत यांनी आपल्या या कवितेत वापरलेले आहे. त्यामुळे यमक अलंकाराचे सुंदर असे उदाहरण दिसून येते.
Answer:
it's your right answer